अंत्यविधीहून येणाऱ्या पती-पत्नीचा नाशिक मध्ये भीषण अपघात ;एका किंकाळीनंतर सारेच शांत…

    दिनांक : 17-Feb-2022
Total Views |
नाशिकः नातेवाईकाचा अंत्यविधी आटोपून घरी परतणाऱ्या पती-पत्नीला नाशिकरोड येथे मागून आलेल्या डंपरने चिरडल्याची भीषण घटना घडली. या अपघातामध्ये दुचाकीवरील जोडप्याचा जागीच मृत्यू झाला, तर डंपर चालकाने पोबारा केला. विठ्ठल घुगे (वय 49) आणि सुनीता घुगे (वय 47) अशी मृतांची नावे आहेत. घुगे दाम्पत्य मखमलाबाद येथे नातेवाईकाच्या अंत्यविधीला गेले होते. अत्यंविधी झाल्यानंतर ते हिरोहोंडा दुचाकीवरून (एमएच 15 ईव्ही 1867) नाशिक-पुणे महामार्गाने निघाले. ते दत्त मंदिराजवळील हॉटेल सद्गगुरू समोर येताच पाठीमागून वेगात आलेल्या डंपरने त्यांना चिरडले. या अपघातात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. डम्परचालक उड्डाणपुलावरून पळून गेला. यावेळी घटनास्थळी लोकांनी तोबा गर्दी केली. अपघातानंतर रस्त्यावर हाडमांसाचा सडा पडला होता. 
 


ghughe 
 
 
एका किंकाळीनंतर सारेच शांत…
 
दत्त मंदिराजवळीस हॉटेलजवळ मागून आलेल्या डम्परने घुगे दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर गाडीवर सुनीता घुगे यांनी एक प्रचंड मोठी किंकाळी फोडली. किंकाळी आणि धडकेचा आवाज ऐकुन परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. रस्त्यावरील वाहनचालकांनी गाड्या थांबवल्या. अनेकांनी मदतीसाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांना रुग्णालात नेणे सुद्ध शक्य झाले नाही. दोघांनी जागेवरच क्षणार्धात प्राण सोडले. अपघाताची माहिती पोलिसांनी देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत गुन्हा दाखल केला.
 
आम्ही निघालो आहेत. पाणी तापायला ठेवा, असा निरोप दिला आणि....
 
विठ्ठल घुगे यांनी अत्यंविधी आटोपल्यानंतर घरी मुलांना फोन केला. आम्ही निघालो आहेत. पाणी तापायला ठेवा, असा निरोप दिला. मुलांनी पाणी तापायला ठेवले.मात्र, वाटेत त्यांचा अपघात झाला. ही माहिती समजताच त्यांची मुलगी आणि मुलाने घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर पडलेला आई-वडिलांचा चिखल-मासांचा सडा पाहून त्यांनी आकांत मांडला. आई-पप्पा, आई-पप्पा असे शब्द आणि किंकाळ्यांनी परिसरही हादरला. त्यांचे दुःख पाहून उपस्थितांच्या डोळ्यांतही पाणी आले. या दोन्ही मुलांना प्रचंड मानसिक धक्का बसल्याचे दिसत होते.
 
गेल्या काही दिवसांत नाशिकमध्ये अपघात वाढले आहेत. वाहनधारक अतिशय सुसाट गाड्या चालवतात. त्यामुळे त्यांच्या वेगाला निर्बंध घालण्याची गरज आहे. ऑगस्ट महिन्यात तर नाशिकमध्ये तब्बल नऊ दुचाकीस्वारांचा अपघातामध्ये मृत्यू झाला होता.