केकेआरची मोठी घोषणा, मुंबईचा सुपुत्र कोलकाता नाइट रायडर्सचा कॅप्टन

16 Feb 2022 18:13:51
कोलकाता: IPL 2022 च्या सीजनसाठी कोलकाता नाइट रायडर्सने कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. KKR ने भारताचा मधल्याफळीतील फलंदाज आणि दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार श्रेयस अय्यरचीकोलकाता नाइट रायडर्सच्या कर्णधारपदी निवड केली आहे. मेगा ऑक्शन संपल्यानंतर तिसऱ्याचदिवशी KKR ने कॅप्टनच्या नावाची घोषणा केली आहे. KKR ने टि्वट करुन श्रेयस अय्यरसची संघाच्या कर्णधारपदी निवड करत असल्याचे जाहीर केले आहे. श्रेयस अय्यर इंग्लंडच्या इयन मॉर्गनची जागा घेणार आहे. मॉर्गन कोलकाता नाइट रायडर्सचा कॅप्टन होता. त्याने मागच्या सीजनमध्ये KKR ला फायनलपर्यंत पोहोचवले होते. फलंदाजीत अपयशी ठरल्यामुळे कोलकाताने मॉर्गनला रिटेन केलं नाही व यावेळच्या लिलावात विकतही घेतलं नाही. KKR नव्या कर्णधाराच्या शोधात होती. त्यांनी श्रेयस अय्यरला खरेदी करण्यासाठी मोठी रक्कमही खर्च केली.
 

shreyas 
श्रेयस अय्यर मागच्या सीजनपर्यंत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत होता. 2018 चा सीजन सुरु असताना मध्येच दिल्ली कॅपिटल्सने त्याला कर्णधार बनवले होते. 2020 च्या सीजनमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ फायनलपर्यंत पोहोचला. श्रेयसच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ पहिल्यांदा फायनलपर्यंत पोहोचला होता. मुंबई इंडियन्सने अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला होता.
 
श्रेयसने दिल्लीचा संघ सोडण्याचे कारण
 
2021 च्या सीजनआधी श्रेयस दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे स्पर्धेचे पहिले सत्र तो खेळू शकला नाही. त्यावेळी दिल्लीच्या ऋषभ पंतला कर्णधार बनवण्यात आले. पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ प्लेऑफ पर्यंत पोहोचला. दिल्लीने त्यानंतर ऋषभ पंतलाच कर्णधारपदी कायम ठेवले. त्यामुळे श्रेयस अय्यरने दिल्लीची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. IPL 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये त्याला ताफ्यात घेण्यासाठी फ्रेंचायजींमध्ये चुरस दिसली. अखेर KKR ने बाजी मारली. कोलकाता नाईट रायडर्सने 12.25 कोटी रुपये मोजून श्रेयसला विकत घेतलं. KKR च्या 14 वर्षाच्या इतिहासातील सहावा कॅप्टन आहे. फ्रेंचायजीचा सर्वात पहिला कॅप्टन सौरव गांगुली होता. त्यानंतर ब्रँडन मॅक्कलमने ही जबाबदारी संभाळली. त्यानंतर गौतम गंभीर बराचकाळ केकेआरचा कॅप्टन होता.
Powered By Sangraha 9.0