'लव्ह जिहाद'वर बनलेल्या 'द कन्व्हर्जन' लवकरच होणार चित्रपटगृहात प्रदर्शित

12 Feb 2022 16:56:00
मुंबई : प्रदीर्घ संघर्षानंतर 'लव्ह जिहाद'वर बनलेल्या 'द कन्व्हर्जन' या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने यूए प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यूए म्हणजे 'अनरिस्ट्रिक्टेड विथ क्युशन', म्हणजेच मुले देखील हा चित्रपट पाहू शकतात. हा चित्रपट पाहण्यासाठी फक्त १२ वर्षांखालील मुलांना त्यांच्या पालकांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असेल. साधारणपणे या श्रेणीतील चित्रपटांना प्रमाणपत्र दिले जाते.
 

the-conversion-movie
 
भाजपशासित अनेक राज्यांमध्ये 'लव्ह जिहाद' विरोधात कायदे करण्यात आले आहेत आणि इतर अनेक राज्यांमध्ये त्याची तयारी सुरू आहे. अशा गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मुस्लीम तरुण आपली ओळख लपवून काही हिंदू नाव घेतात आणि नंतर हिंदू मुलीला आपल्या जाळ्यात अडकवतात, असे अनेकदा दिसून येते. मुलीला सत्य कळते तोपर्यंत सर्व संपलेले असते.त्यांच्याशी लग्न केल्यानंतर इस्लामिक धर्मांतरासाठी छळ केला जातो. अशा घटनांमध्ये खूनही होतात.
 
या संवेदनशील विषयावर हा चित्रपट बनवला आहे. आजच्या मुलींनी हा चित्रपट जरूर पाहावा, असे चित्रपटाच्या निर्मात्यांचे म्हणणे आहे. विनोद तिवारी यांनी हा चित्रपट बनवला असून सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्यांनी बराच काळ संघर्ष केला. 'लव्ह जिहाद'मुळे होणारे शोषण, छळ आणि कुटुंब आणि समाजावर होणारे परिणाम या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. सहा महिन्यांपासून या संदर्भातील प्रयत्न सुरू होते. संजय भूषण पटियाला या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत.
 
सेन्सॉर बोर्डाने यूए प्रमाणपत्र दिल्यानंतर विनोद तिवारी यांनी या चित्रपटाचे वर्णन 'सत्याचा विजय' असे केले आहे. त्याचा ट्रेलर यूट्यूबवरून काढून टाकण्यासाठी आणि रिलीज थांबवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. या चित्रपटात 'लव्ह जिहाद'चा फटका बसलेल्या हिंदू मुलीची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात विंध्या तिवारी, प्रतीक शुक्ला आणि रवी भाटिया मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटात सामाजिक संदेश देण्यात आला असून जनजागृती करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0