एलआयसी आयपीओ लवकरच शेअर बाजारात दाखल होणार

11 Feb 2022 16:30:21
मुंबई : एलआयसीचा आयपीओ म्हणजेच समभाग शेअर बाजारात दाखल करण्यास इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच इर्डा ने मंजुरी दिली आहे. इर्डाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी सेबी कडे पाठवण्यात येईल. सेबीने मंजुरी दिल्यानंतर शेअर बाजारात हे समभाग विक्रीसाठी दाखल होतील.
 
LIC IPO
 
या विक्रीतून एलआयसी चा ५ टक्के हिस्सा खासगी कंपन्यांना विकण्यात येणार आहे. केंद्र सरकारने सुरु केलेल्या निर्गुंतवणूक धोरणाचा हा भाग असून मार्च अखेरीपर्यंत हे समभाग शेअर बाजारात सुचिवबद्ध होण्याची शक्यता आहे.
 
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना या विक्रीबद्दल घोषणा केली होती. या वर्षी निर्गुंतवणुकीतून ७८ हजार कोटी मिळवण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. याआधी एअर इंडिया विक्रीतून सरकारला १२ हजार कोटी मिळाले आहेत. एलआयसीच्या समभाग विक्रीतून साकारला ६० हजार कोटी मिळण्याची अपेक्षा आहे.
Powered By Sangraha 9.0