जळगाव शहर खुनाने पुन्हा हादरले ; जळगावात क्रुरपणे गळा चिरुन तरुणाची हत्या

    दिनांक : 03-Oct-2022
Total Views |
जळगाव : शहरात कालच चार्जरच्या वायरने गाला आवळून महिलेचा खून करण्यात आला. हि घटना ताजी असतानाच  आज पुन्हा कपाळावर शस्त्राने वार करून तसेच क्रुरपणे गळा चिरुन तरुणाची हत्या झाल्याची घटना आज उघडकीस आली. जळगावातील (Jalgaon) दशरथ नगर येथील सौरभ यशवंत चौधरी (वय ३१) असे खून (Crime) झालेल्या तरुणाचे नाव आहे.
 
khun
 
 
 
 
भादली ते शेळगाव दरम्यान पुलानजीकच्या पाटचारीत रस्त्याने जाणाऱ्या लोकांना तरुणाचा मृतदेह (Crime News) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास आढळून आला. यानंतर पोलीस पाटील यांनी नशिराबाद पोलिसांना (Police) घटनेबाबत माहिती दिली. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, भुसावळ (Bhusawal) विभागाचे डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे, नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अनिल मोरे, उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे यांची टीम घटनास्थळी दाखल झाले.
 
पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली. यात सौरभचा गळा चिरलेला व कपाळावर घाव घालण्यात आलेले दिसून आले. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आला. खून कशामुळे झाला? याचा तपास पोलिस करत आहेत