मालदीवमध्ये भारतविरोधी घोषणा केल्यास २० हजार दंड आणि ६ महिन्यांचा तुरुंगवास

    दिनांक : 31-Jan-2022
Total Views |
मालदीव : मालदीवमध्ये चीन समर्थक माजी राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांच्या भारताविरुद्धच्या 'इंडिया आउट' मोहिमेविरोधात सत्ताधारी मालदीवियन डेमोक्रॅटिक पक्षाने जोरदार पाऊल उचलले आहे. वृत्तानुसार, मालदीव सरकार यामीनच्या भारतविरोधी मोहिमेला बेकायदेशीर ठरवण्यासाठी नवीन विधेयक आणत आहे. असे केल्याने मालदीव संतुलित परराष्ट्र धोरण स्वीकारत आहे, जे इतर देशांसोबतचे संबंध मजबूत करण्यात प्रभावी ठरेल.

Modi-Maldives 
 
नवीन विधेयकात भारतविरोधी घोषणा दिल्याबद्दल २० हजार मालदीव रुफियाचा दंड आकारला जाईल. याशिवाय त्याला सहा महिने तुरुंगवास किंवा १ वर्षासाठी नजरकैदेत ठेवले जाऊ शकते. मालदीवमधील पत्रकार अहमद अजान यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले, “मालदीव सरकारने 'इंडिया आउट' स्लोगनचा वापर गुन्हा म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ताधारी पक्षाने तयार केलेल्या विधेयकानुसार या मोहिमेत सहभागी होणाऱ्यांना ६ महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. तुरुंगातून सुटल्यानंतर अब्दुल्ला यामीनच्या 'इंडिया आऊट' मोहिमेला आणखी वेग आला आहे. माजी राष्ट्रपतींनी भारत देशाच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला आहे आणि मालदीवचे सध्याचे सरकार भारताशी हातमिळवणी करत असल्याचे ते म्हणालेत.
 
अशा परिस्थितीत विद्यमान अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह आणि त्यांचा मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टी एमडीपी 'इंडिया आउट' मोहीम थांबवण्यासाठी संसदेत नवीन विधेयक मांडणार आहेत. सोलिह हे 'इंडिया फर्स्ट' परराष्ट्र धोरणाचे खंबीर समर्थक आहेत. त्यांच्या सरकारला अलीकडच्या काही दिवसांत असे आढळून आले आहे की, विरोधकांच्या विषारी भारतविरोधी मोहिमेमुळे मालदीव आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंध खराब होऊ शकतात. त्याचवेळी, विरोधी पक्षांनी नवीन विधेयकाला विरोध दर्शवत हा मालदीवच्या लोकांच्या घटनात्मक अधिकारांवर हल्ला असल्याचे म्हटले आहे. पुरोगामी काँग्रेस आघाडीच्या प्रवक्त्या हीना वालीद यांनी आरोप केला की, "हा थेट लोकांच्या घटनात्मक अधिकारांवर हल्ला आहे. परकीय हितसंबंधांसाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकांच्या एकत्र येण्याच्या अधिकाराचे उल्लंघन केले जाऊ शकत नाही. अलीकडेच मालदीव सरकारमधील परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांनीही यामीन यांना कडक शब्दात सल्ला दिला होता. मालदीवला मदत देणाऱ्या शेजारी देशावर हल्ला करणे मूर्खपणाचे असल्याचे शाहिदने म्हटले होते.