सुवर्ण नगरीत सोन्याचे भाव घसरले ; सोने प्रति तोळा 900 रुपयांनी कमी, तर चांदी 2200 रुपयांनी घसरली

    दिनांक : 28-Jan-2022
Total Views |
जळगाव : सुवर्ण नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव मध्ये सोन्याची (Gold) चकाकी फिकी पडली. तर चांदीची(Silver) चमक कमी झाली आहे. अचानक सोन्याने कोरोना काळात रेकॉर्ड तोड भाव वाढ नोंदवली आहे. त्यामुळे सोन्यात पुर्वीपासून गुंतवणूक करणारे मालामाल झाले. गेल्या अनेक दिवसापासून स्थिर असलेल्या सोन्या-चांदीच्या भावामध्ये मोठी घसरण झाली आहे सोन्याच्या भावात तब्बल 900 रुपयांची घसरण होवून 48 हजार 300 रुपये प्रति तोळा झाला आहे तर चांदीच्या भावात 2 हजार ते 2200 रुपये घसरण होवून चांदीचा भाव 63 हजार 600 रुपये प्रति किलो इतका झाला आहे.
 
gold3
 
 
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर झाल्याने ही घसरण झाल्याचे बोलले जात आहे. 10 जानेवारी रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर 48,560 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चादीचे दर 62,030 रुपये असा होता. 12 जानेवारी 2022 रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर 48,570 रुपये प्रति तोळा एवढे नोंदवले गेले. तर एक किलो चांदीचे दर 62,090 रुपये इतका नोंदविला गेला.
 
आंतरराष्ट्रीय बाजारातील मौल्यवान धातूंच्या किंमतीमधील तेजीचा परिणाम देशांतर्गत बाजारावर दिसून येत आहे. जळगाव सराफ बाजारात सलग भावात सलग पडझड दिसून येत आहे. सोने (Gold Rate) दरात 900 रुपयांची घसरण दिसून आली. तर दुसरीकडे चांदी (Silver Rate) देखील 2200 रुपयांनी तुटली. यापूर्वी 18 जानेवारी रोजी जळगाव सराफ बाजारात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 49,040 इतका होता. तर चांदीचा प्रति किलोचा भाव 63,350 रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते. दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात 4 ते 5 हजारांची वाढ दिसून येते.
 
10 जानेवारी (सोमवार) रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर 48,560 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चादीचे दर 62,030 रुपये असा होता. 11 जानेवारी रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर 48,570 रुपये प्रति तोळा एवढे होते. तर एक किलो चांदीचे दर 62,090 रुपये इतका नोंदविला गेला. 12 जानेवारी 24 कॅरेट सोन्याचे 48,810 रुपये प्रति तोळा एवढे होते. तर एक किलो चांदीचे दर 62,4540 रुपये इतका नोंदविला गेला. १३ जानेवारी रोजी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 48,930 रुपयावर होते. तर चांदीचा प्रति किलोचा भाव 63,310 रुपये इतका होता.
 
घरबसल्या मिळवा सोन्याचे भाव
 
तुम्ही घरबसल्या सोन्याचे भाव मिळवू शकतात. 8955664433 या क्रमांवर मिस्ड् कॉल देण्याद्वारे तुम्हाला मेसेज प्राप्त होतील. तुम्ही प्रमुख शहरातील सोन्याचे भाव तपासू शकतात.
 
सोन्याची शुद्धता पहा ‘अ‍ॅप’ वर?
 
केंद्रीय ग्राहक आणि अन्न मंत्रालयाने BIS-केअर मोबाईल अ‍ॅप लाँच केलं आहे. या अ‍ॅपद्वारे सोनं खरंच किती शुद्ध आहे, याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यामुळे सोन्यात इतर धातूंच मिश्रण करुन लुबाडणाऱ्यांना चांगलाचा धडा मिळणार आहे. सोनं कितपत शुद्ध आहे, याची खरंच योग्य माहिती दिली तर या अ‍ॅपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे