पुणे-नगर महामार्गावर शिक्रापूर येथील तीन वाहनांचा भीषण अपघात ;५ मृत्यू तर २ गंभीर जखमी

24 Jan 2022 10:46:22
पुणे : पुणे नगर महामार्गावर शिक्रापूर येथे झालेल्या भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २ जण गंभीर जखमी आहेत. हा अपघात तीन वाहनांमध्ये झाला आहे.
 

accident2 
 
 
पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रवीवारी रात्री तीन वाहनांत भीषण अपघात झाला. ट्रक, टी व्हिलर आणि फोर व्हिलर एकमेकांवर आदळल्याने ही गटना घडली. या दुर्घटनेत एकूण पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तसेच यामध्ये दोन जणांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
 
दरम्यान, 19 जानेवारी रोजी तीन गाड्यांचा असाच एक भीषण अपघात झाला होता. मुंबईच्या दिशेने जात असताना मुंबई-नाशिक महामार्गावर हा अपघात घडला होता. यामध्ये ट्रक चालकाचे आपल्या गाडीवरील नियत्रंण अचानकपणे सुटले होते. पुढे जात असलेल्या दोन गाड्यांना या ट्रकने जोरदार धडक दिली होती. या अपघातात ट्रक रस्त्याच्या बाजूला लावण्यात आलेल्या विजेच्या खांबावर जाऊन आदळला होता. यामध्ये ट्रकची मोठी नासधूस झाली होती.
Powered By Sangraha 9.0