मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवाल हीच पती गौतम किचलूने इन्स्टाग्राम अकाउंटवर पत्नी काजल अग्रवालचा एक सुंदर फोटो शेअर केला होता. यासोबत त्यांनी लिहिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
फोटो पोस्ट करत त्याने लिहिले, 2022 तुझी वाट पाहत आहे. यासोबतच त्याने गर्भवती महिलेचा इमेजही शेअर केली होता. त्या दिवसांपासून तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. एअरपोर्टवरून काजलचा एक फोटो व्हायरल झाला, ज्याला पाहून लोक तिच्या प्रेग्नेंसीबद्दल अंदाज बांधू लागले. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर काही दिवसांनी काजलने मीडियाशी बोलताना सांगितले होते की, मला सध्या याबद्दल बोलायला आवडणार नाही. योग्य वेळ आल्यावर मी याबद्दल बोलेन. मात्र, यादरम्यान तिने तिच्या गरोदरपणाची बातमी फेटाळून लावली नाही.