वैष्णवदेवी यात्रा पुन्हा सुरु; चेंगराचेंगरी प्रकरणी चौकशी समिती गठीत

    दिनांक : 01-Jan-2022
Total Views |
जम्मू : नवीन वर्षाच्या निमित्ताने जम्मूच्या कटरा मधील वैष्णो देवी मंदिर परिसरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांनी गर्दी केली होती. रात्री 2 वाजेच्या सुमाराम येथे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर आता जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी चौकशी समिती गठित केली आहे.
 

devi 
 
 
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बचावकार्य सरु आहे. जखमींना नारायण रुग्णालयात नेण्यात येत असून, एकूण जखमींच्या संख्येबाबत अधिक माहिती स्पष्ट झाली नाही. माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात अचानकपणे झालेल्या या चेंगराचेंगरीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
 
या दुर्घटनेनंतर प्रशासनावर अनेक सवाल उपस्थित होत आहेत. कोरोना काळात एवढी गर्दी कशी झाली? गर्दी झाली तर सुरक्षेची व्यवस्था का नव्हती? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागलेत. आता घटनेनंतर प्रशासनाला जाग आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराज्यपाल मनोज सिन्हा या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. सोबतच घटनेतील मृतांच्या परिवारांना पंतप्रधान मदत निधि आणि राज्य सरकारकडून मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

पंतप्रधान मदत निधितून मदत
 
मृतांच्या नातेवाईकांसाठी- 2 लाख रुपये
जखमींना उपचारासाठी - 50 हजार रुपये
 
राज्य सरकारकडून मदत
 
मृतांच्या नातेवाईकांसाठी- 10 लाख रुपये
जखमींना उपचारासाठी - 2 लाख रुपये
 
रात्रीच्या सुमारास अचानक गोंधळ झाल्यानं चेंगराचेंगरी
 
नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी वैष्णो देवी मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. रात्रीच्या सुमारास अचानक गोंधळ झाल्यानं चेंगराचेंगरी झाली. पंतप्रधान मोदी यांनी या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. सरकारकडून दुर्घटनेत मृत पावलेल्या भाविकांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये प्रत्येकी तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत घोषित केली आहे. शिवाय मदतीसाठी हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आला आहे.
 
हेल्पलाईन नंबर जारी
 
Shri Mata Vaishno Devi Shrine Board Helpline nos: 01991-234804 01991-234053
Other Helpline nos: PCR Katra 01991232010/ 9419145182
PCR Reasi 0199145076/ 9622856295
DC Office Reasi Control room 01991245763/ 9419839557