१५ ते १८ वयोगटातील मुलांचे सोमवारपासून लसीकरण!

01 Jan 2022 19:42:54
नवी दिल्ली : भारतात ३ जानेवारी पासून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास सुरुवात होणार असून कोविन अॅप आणि संबंधित वेबसाईटवर रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे. या वयोगटातील मुलांना भारत बायोटेक निर्मित कोव्हॅक्सिन ही लस देण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
 

Vaccination 
 
भारतात या वयोगटातील मुलांची संख्या साधारण १० कोटी आहे. कोविन अॅपवर नोंदणीसाठी आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र नसल्यास इयत्ता १०वीचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार असल्याचे कोविन प्रमुख डॉ. आर. एस. शर्मा यांनी सांगितले.
 
नोंदणीप्रक्रिया पुढीलप्रमाणे असेल...
 
*सर्वात आधी आरोग्य सेतू अॅपवर किंवा cowin.gov.in या संकेतस्थळावर जाणे.
 
*कोविनवर नोंदणी केली नसल्यास प्रथम नोंदणीचा पर्याय निवडावा. (नोंदणी केली असल्यास मोबाईलनंबर टाकून OTP मेंशन करावा.)
 
*त्यानंतर नोंदणीचे पान दिसल्यानंतर तेथे तुमचे नाव, संपर्क, तुमचा फोटो, ओळखपत्र, इत्यादी विचारलेली माहिती भरावी. (याठिकाणी तुम्ही १०वी च्या ओळखपत्राची निवड करू शकता.)
 
*नोंदणी पूर्ण करून झाल्याचा संदेश तुमच्या मोबाईलवर येईल.
 
*त्यानंतर तुमच्या क्षेत्राचा पिनकोड टाकल्यास लसीकरण केंद्रांची यादी समोर येईल.
 
*केंद्राची निवड केल्यानंतर तारीख आणि वेळ लिहून स्लॉट बूक करावा.
 
*लसीकरण केंद्रावर गेल्यावर तुम्हाला तुमचे ओळखपत्र आणि नोंदणी केल्यानंतर मिळालेला सिक्रेट कोड संबंधित अधिकाऱ्यांना सांगावा.
 
*आपली लसीकरण प्रक्रिया पूर्ण होईल.
 
*एका मोबाईलनंबरवरून जास्तीतजास्त चार जणांची नोंदणी करता येऊ शकते.
 
अटलजींच्या वाढदिवशी मोदींची घोषणा...
 
२५ डिसेंबर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या जन्मदिवसाचे औचित्यसाधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ जानेवारी पासून १५ ते १८ वयागटातील मुलांचे लसीकरण होणार असल्याची घोषणा केली. इतर व्याधी असणाऱ्या ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आणि फ्रंटलाईन वर्कर्सना बूस्टर डोस देणार असल्याचे मोदींनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0