बांगलादेशने जिंकली टी-20 मालिका

    दिनांक : 09-Sep-2021
Total Views |
ढाका: बांगलादेशने चौथ्या सामन्यात न्यूझीलंडवर 6 गड्यांनी मात करून पाच सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका 3-1 ने जिंकली. गत तीन महिन्यात बांगलादेशचा हा तिसरा मालिका विजय आहे. बांगलादेशने जुलै महिन्यात झिम्बाब्वेवर 2-1 ने आणि ऑगस्ट महिन्यात ऑस्ट्रेलियावर 4-1 ने मात केली.
 

babgla_1  H x W 
 
न्यूझीलंडला 19.3 षटकात 93 धावांत गुंडाळल्यानंतर बांगलादेशने 19.1 षटकात 4 बाद 96 धावा काढून आपला विजय साकार केला. या सामन्यात नसूम अहमद व मुस्तफिजूर रहमानने प्रत्येकी 4 बळी टिपले. नसूम सामनावीर ठरला.