मुंबई : स्टंटवर आधारित रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी 11’ ने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. गेले काही आठवडे थ्रीलर आणि अॅक्शनने भरलेले पाहायला मिळाले. शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांनी आपल्या दमदार कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. अर्जुन बिजलानीने रोहित शेट्टीचा हा शो जिंकला आहे आणि अंतिम फेरीत पोहोचलेल्या इतर स्पर्धकांना मागे टाकले आहे. तो 11 व्या सीझनचा विजेता ठरला आहे.
संपूर्ण शो दरम्यान अर्जुनने जबरदस्त खेळ दाखवला. त्याच्यासह दिव्यांका त्रिपाठी आणि विशाल आदित्य सिंह पहिल्या तीनमध्ये पोहोचले. दिव्यांका त्रिपाठीने तिच्या स्टंट्सने एक वेगळी छाप सोडली. पडद्यावर सूनेच्या भूमिकेत दिसणार्या दिव्यांकाने प्रत्येक स्टंट खूप छान केला. ती या शोची फर्स्ट रनर अप होती. दिव्यांका कदाचित शो जिंकण्यात यशस्वी झाली नसेल पण तिने प्रेक्षकांची मने नक्कीच जिंकली. अर्जुन व्यतिरिक्त, दिव्यांका, विशाल, श्वेता तिवारी आणि वरुण सूद टॉप 5 मध्ये पोहोचले. शो जिंकल्यानंतर अर्जुन बिजलानीला ट्रॉफी, 20 लाख रोख आणि एकदम नवीन कार देण्यात आली.