भारत-नेपाळ मैत्री...आज फुटबॉल सामना

02 Sep 2021 14:26:24
काठमांडू: पुढील महिन्यात मालदीवमध्ये होणार्‍या दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून गुरुवारी येथे भारत आणि नेपाळ यांच्या आंतरराष्ट्रीय मैत्री फुटबॉल सामना खेळला जाणार आहे. मालेच्या नॅशनल स्टेडियममध्ये आगामी 3 ते 13 ऑक्टोबरदरम्यान दक्षिण आशियाई (साफ) फुटबॉल स्पर्धा होणार असून यात पाच देशांचे फुटबॉल संघ सहभागी होणार आहेत.
 
india_1  H x W: 
 
 
भारताशिवाय बांगलादेश, श्रीलंका, यजमान मालदीव व नेपाळ संघ विजेतेपदासाठी झुंजणार आहे. आम्ही येथे पुन्हा एकत्र आल्यामुळे चांगले वाटत आहे. येथे होणारे दोन मैत्री फुटबॉल सामने, हे साफ स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी फायदेशीर ठरतील. आम्हाला प्रत्यक्ष मैदानावर राहून काही गोष्टी शिकण्याची गरज आहे, असे भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक इगोर स्टीमॅक म्हणाले. नेपाळविरुद्धचा दुसरा मैत्री सामना 5 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. हे दोन्ही सामने दशरथ स्टेडियममध्ये होतील. गत 15 जून रोजी विश्वचषक पात्रता व 2023 आशिया चषक पात्रता स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्धच्या अखेरच्या गटसाखळी सामन्यानंतरचा भारतीय संघाचा हा पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना असेल.
Powered By Sangraha 9.0