SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी अलर्ट!

14 Sep 2021 13:54:03
नवी दिल्ली : जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आहे. देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक बँक एसबीआयच्या काही सेवा 15 सप्टेंबरला 2 तास बंद राहतील. या काळात एसबीआय ग्राहक कोणतेही व्यवहार करू शकणार नाहीत. एसबीआयने ट्विटरवर (Twitter) अलर्ट जारी करून ही माहिती दिली आहे.
  

SBI_1  H x W: 0
 
एसबीआयने ट्विटमध्ये म्हटले आहे की, सिस्टमच्या देखभालीमुळे 15 सप्टेंबरला बँकेच्या काही सेवा बंद राहतील. या सेवांमध्ये इंटरनेट बँकिंग, योनो, योनो लाइट आणि यूपीआय सेवा समाविष्ट असतील. तसेच, 15 सप्टेंबरच्या रात्री 12 ते 2 वाजेपर्यंत या सेवा उपलब्ध होणार नाहीत, असे एसबीआयने ट्विटद्वारे सांगितले आहे. याशिवाय, या काळात ग्राहकांनी कोणत्याही प्लॅटफॉर्मवर व्यवहारांसह इतर उपक्रम टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे बँकेने म्हटले.
Powered By Sangraha 9.0