मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण सध्या तिच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. मात्र, शनिवारी रात्री ती मैत्रीण पीव्ही सिंधू सोबत डिनरला जाताना दिसली. दीपिकासोबत पती रणवीर सिंगही होता. तिघेही स्पॉट झाले होते. त्यांना मुंबईच्या एका नामांकित रेस्टॉरंटबाहेर स्पॉट केले गेले. त्यावेळी फोटोग्राफर्सनी त्यांना स्पॉट केले. रणवीरने या खास क्षणाचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तसेच पीव्ही सिंधूने देखील हा फोटो शेअर करत, आमच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून तुम्हाला कळत असेलच की आम्ही खुप एंजॉय केले, असे कॅप्शन दिले आहे.
यावेळी दोघीही व्हाइट ड्रेसमध्ये दिसल्या. तर दीपिकाने ब्लॅक स्कर्टही परिधान केले होते. दरम्यान, फोटो घेताना दीपिकाने सिंगल फोटो देण्यास नकार दिला व सिंधू सोबतच फोटो घ्यायला सांगितला. दीपिका म्हणाली, माझा सोलो नाही, तिचा घ्या.' वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास दीपिका आणि रणवीर आगामी '83′ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. तसेच रणवीर लवकरच आपले छोट्या पडद्यावर सूत्रसंचालक म्हणून पदार्पण करणार आहे. दुसरीकडे दीपिका शाहरुख खानसोबत 'पठाण'मध्येही मुख्य भूमिका साकारत आहे.