तालिबानने पंजशीरमध्ये केली 20 जणांची हत्या

पुन्हा मोडले वचन

    दिनांक : 14-Sep-2021
Total Views |
काबुल: अफगाणिस्तानमध्ये सत्ता आल्यानंतर तालिबानचे खरे रंग जगाला दिसायला सुरुवात झाली आहे. पंजशीरवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानने 20 निष्पाप नागरिकांची निर्घृण हत्या केली आहे.
 

Kabul_1  H x W: 
 
 
यात एका दुकानदाराचा समावेश असल्याचा दावा एका वृत्तसंस्थेने केला आहे. या नागरिकांचा तालिबानविरोधी लढ्यात कुठलाही सहभाग नसताना केवळ संशयाच्या आधारे त्यांची हत्या करण्यात आली आहे. तालिबानला विरोध करणार्‍या रजिस्टंट फोर्सला सिमकार्ड विकल्याचा संशय आल्याने तालिबान्यांनी एका दुकानदाराची हत्या केली. माझा तालिबानविरोधी लढाईशी कोणताही संबंध नाही, असे या दुकानदाराने तालिबान्यांनी अपहरण केल्यानंतर सांगितले होते. मात्र, रजिस्टंट फोर्सला सिमकार्ड विकल्याच्या संशयावरून तालिबान्यांनी गोळ्या घालून त्याची हत्या केली. नंतर त्याचा मृतदेह घराबाहेर फेकला. या दुकानदाराने तालिबान्यांना आपले ओळखपत्र दाखवूनही त्याची हत्या केली.
 
हत्या झाल्यानंतर तालिबानने हे आरोप फेटाळले आहेत. कुठल्याही निरपराध नागरिकाला धक्का लावला नसल्याचे तालिबानने सांगितले. पंजशीरवर ताबा मिळाल्यानंतर तिथल्या सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाला कुठलाही धोका नसून त्यांच्याविरोधात कुठलीही कारवाई करणार नसल्याचे तालिबानने जाहीर केले होते.