पारोळा पंचायत समिती येथे रोजगार सेवकांचे उपोषण

    दिनांक : 14-Sep-2021
Total Views |
पारोळा : येथील पंचायत समितीच्या आवारात ग्रामरोजगार सेवकांचे विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. त्यांची नगराध्यक्ष करण पवार यांनी भेट घेत मागण्या जाणून घेतल्या व खा.उन्मेष पाटील यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी राऊत यांच्याशी सवांद साधून विषय मार्गी लावण्याची विनंती केली त्यावर जिल्ह्याधिकारी राऊत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
 
pachora11_1  H  
 
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा 2005 अंतर्गत काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांना गावात विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे याबाबत युनियन मार्फत वेळोवेळी तोंडी व लेखी स्वरूपाच्या समस्या मांडून त्यांचे निराकरण न झाल्याने ग्रामरोजगार सेवकांनी उपोषणाचे हत्यार उपसले. यावेळी उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान, नगरसेवक बापू महाजन, पी जी पाटील, भैय्या चौधरी उपस्थित होते.
 
बीडीओंच्या लेखी आश्वसनांतर उपोषण मागे
 
गटविकास अधिकारी विजय लौंढे यांच्या या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले दरम्यान उपोषणस्थळी बाजार समितीचे सभापती अमोल पाटील, जि.प.सदस्य डाँ. हर्षल माने यांनी भेट दिली.
 
उपोषणात यांचा होता सहभाग
 
जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे, तालुका अध्यक्ष शरद पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रभाकर भोई, युनियन चे सदस्य लहू पाटील, सूर्यभान पाटील, रमेश वंजारी, जगदीश पाटील, दत्तात्रय पाटील, कविता पाटील, समाधान पाटील, संजय पाटील, जगदीश पाटील, प्रदीप पाटील, विनोद सैंदाणे, उत्तम पाटील, योगेश पाटील, हिरालाल पाटील, भरत राठोड, नाना पाटील, प्रमोद पाटील, सुनील पाटील, अजित पाटील, राहुल पाटील, रामदास पाटील, भूषण महाजन, उमेश पाटील ,कैलास पाटील, प्रकाश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, नंदू पाटील, सजन पाटील, शिवदास खैरनार, अनिल पाटील, विकास पाटील, योगेश पाटील, भीमराव जावळे आदी ग्राम रोजगार सेवक उपोषण आंदोलनात सहभागी झाले होते.