पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची जळगावात बदली

14 Sep 2021 12:09:33
जळगाव : पारनेरचे तहसीलदार ज्योती देवरे यांची जळगाव येथे बदली झाली आहे. काही दिवसांपूर्वी ज्योती देवरे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर देवरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. लंके यांनी देवरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. दरम्यान, ज्योती देवरे यांची बदली करण्यात आल्यानंतर आता भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय.
 
chitra-wagh_1   
पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांची जळगावला बदली करण्यात आल्याचं समजतं. महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध आहे. हे सरकार लोकधार्जीणं नाही तर त्यांचे आमदार, मंत्री बगलबच्चे धार्जिणे आहेत. ही बदली एका ज्योती देवरेची नाही तर 500 पेक्षा अधिक कार्यरत महिला तहसीलदारांचे मनोबल खच्चीकरण करण्याचं काम या सरकारनं केलं असल्याची टीका चित्रा वाघ यांनी केलीय.
 
 
Powered By Sangraha 9.0