जगाचे इस्लामीकरण करण्याचा ओवैसींचा अजेंडा

    दिनांक : 14-Sep-2021
Total Views |
नवी दिल्ली: "असदुद्दीन ओवैसींचा अजेंडा हा धार्मिक आहे. त्यांना देशातील दुसरा जिन्ना व्हायचं आहे. त्यांचा फक्त एकच अजेंडा आहे, तो म्हणजे जगाचं तालिबानीकरण आणि इस्लामीकरण करणे," अशाप्रकारे बिहारमधील बिसफीचे भाजपा आमदार हरी भूषण ठाकूर यांनी पाटण्यामध्ये बोलताना एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींच्या कार्यप्रणाली बाबत आपले मत व्यक्त केले.
 

ovesi_1  H x W: 
 
काही दिवसांपूर्वी असदुद्दीन ओवैसी यांच्या वक्तव्यामुळे जातीय तेढ निर्माण होऊन सलोखा बिघडल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविड नियमांचे पालन न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात असभ्य व अपमानकारक वक्तव्ये केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. ओवैसी यांच्याविरोधात बाराबंकी पोलिसांनी त्यांच्या पक्षाच्या सभेत असभ्य वक्तव्ये केल्याने गुन्हा दाखल केला आहे. भादंवि १५३ ए (धार्मिक तेढ), कलम १८८ (सार्वजनिक सेवकांचा अवमान), कलम २६९ (रोग प्रसाराने इतरांना धोका निर्माण करणे), कलम २७० ( रोग पसरवण्यास कारण ठरणे) तसेच साथरोग कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षकांनी म्हटले आहे.