भूपेंद्र पटेल यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

    दिनांक : 13-Sep-2021
Total Views |
गांधीनगर : विजय रुपाणी यांनी शनिवारी (11 सप्टेंबर) राजीनामा दिल्यानंतर रविवारी (12 सप्टेंबर) पहिल्यांदाच आमदार बनलेल्या भूपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं. त्यांनी म्हटलं, "भूपेंद्रभाईंचं गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन. मी त्यांना अनेक वर्षांपासून केवळ त्यांच्या कामामुळे ओळखत आहे. ते गुजरातच्या विकासाला पुढे घेऊन जातील.
 
Bhupendra Patel_1 &n
 
भूपेंद्र पटेल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधी कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते तसंच भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. भूपेंद्र पटेल हे गुजरात विधिमंडळाचे नेते म्हणून निवडले गेल्याची माहिती केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पत्रकार परिषदेत दिली. नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितलं की, "भूपेंद्र पटेल लवकरच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. गांधीनगरमध्ये भाजपच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक झाली. त्यात पटेल यांचं नाव जाहीर करण्यात आलं.