आलियाने पूर्ण केले 'डार्लिंग'चे शूटिंग

    दिनांक : 10-Sep-2021
Total Views |
मुंबई : आघाडीची अभिनेत्री आलिया भट्‌टकडे सध्या अनेक चित्रपटांची रांग लागली असून ती या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. संजय लीला भंसालीच्या 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटाचे काही दिवसांपूर्वीच तिने शूटिंग पूर्ण केले होते. यानंतर आता तिने आपल्या स्वतःच्या प्रोडक्‍शन हाउसच्या पहिल्या 'डार्लिंग्स' चित्रपटाचेही काम पूर्ण केले आहे.
 
aliya_1  H x W:
 
या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर कलाकारांसह क्रू मेंबर्सनी मिळून केक कापत आनंदोत्सव साजरा केला. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास आलियाचे अनेक चित्रपट रिलीज होण्याच्या प्रतिक्षेत आहे. सध्या तिच्या 'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगत आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 
आलिया भट्‌ट, विजय शर्मा आणि दिग्दर्शक जसमीत यांनी काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना माहिती दिली. 'डार्लिंग्स' ही एक आई-मुलीची एक अनोखी कथा आहे, जी जगात आपले स्वतःचे स्थान शोधण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागतो. या चित्रपटात शेफाली शाह आणि रोशन मॅथ्यू यांनीही निर्णायक भूमिका साकारली आहे.