अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर; अशी तपासा Merit List

    दिनांक : 28-Aug-2021
Total Views |

पुणे : अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर झाली. अकरावी प्रवेशासाठी मुंबई विभागातील तब्बल 3 लाख 20 हजार 710 जागांसाठी 2 लाख 37 हजार 383 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. यातील अवघ्या 2 लाख 2 हजार 58 विद्यार्थ्यांनी कॉलेज पसंतीचे पर्याय भरले होते. शिक्षण संचालनालयाकडून मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या महापालिका क्षेत्रात असलेल्या अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.
 
Admisson_1  H x 
 असे पहा पहिल्या गुणवत्ता यादीत तुम्हाला मिळालेले कॉलेज 
- अकरावी ऑनलाइन प्रवेशांचे संकेतस्थळ https://mumbai.11thadmission.org.in/Public/Home.aspx वर जा.

- आपला आयडी पासवर्ड देऊन याठिकाणी लॉगिन करा.

- ल़ॉगिन केल्यानंतर स्क्रीनवर तुमचे डिटेल्स येतील.

- डॅश बोर्डवर 'चेक अलॉटमेंट स्टेटस' या पर्यायावर क्लिक करा.

- कॉलेज अलॉट झालं असेल तर तुमचं नाव इथे दिसेल

पुणे विभागातून 311 कनिष्ठ महाविद्यालयांत एक लाख ११ हजार २०५ जागांसाठी प्रवेशप्रकिया राबवली जातीये. पहिल्या फेरीत 56 हजार 767 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यापैकी 38 हजार 858 विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले आहेत. 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत. पहिल्या यादीत कला शाखेसाठी २ हजार ४५६, वाणिज्य शाखेतील ८ हजार ५७० आणि विज्ञान शाखेच्या २२ हजार ६६५ जणांना प्रवेश जाहीर झाला आहे.