तोरणमाळ पर्यटन विकासाबाबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंची बैठक

21 Aug 2021 11:16:23
धडगाव प्रतिनिधी : माजी आ. चंद्रकांत रघुवंशी व जिल्हा परिषद सदस्य गणेश पराडके यांच्या विनंतीवरून राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मंत्री यांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळच्या विकासासंदर्भात बैठक घेतली. 
 
Toranmal_Aaditya Thackera
 
या बैठकीबाबत पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटर वर उत्तर महाराष्ट्रातील महत्वाचे पर्यटन केंद्र म्हणून तोरणमाळ चा विकास करत रोजगाराचा संधी उपलब्ध करण्याचा मानस असल्याचे नमूद केले.
 
या बैठकीस नंदुरबार व धुळे जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, पर्यटन संचालक सावळकर, जि प सदस्य गणेश पराडके उपस्थित होते. बबनराव थोरात यांनी तोरणमाळ विकास आराखडा सादर करून तोरणमाळ विकासासंदर्भात चर्चा करीत तोरणमाळचा विकास झाल्यास दरवर्षी लाखोच्या संख्येने तोरणमाळ या आध्यात्मिक व प्रेक्षणीय स्थळाला भेट देणाऱ्या भाविक व निसर्गप्रेमींना नक्कीच भुरळ घालेल असेही त्यांनी मत व्यक्त केले. तोरणमाळ व आजुबाजुच्या परिसरात वृक्षलागवड झाल्यास पर्यटन विकासासोबतच पर्यावरणाचाही समतोल राखण्यात यश येईल, असे गणेश पराडके यांनी मांडले. व्हीडिओ कॉन्फरन्स द्वारा नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री, माजी आ. चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाप्रमुख आमशा पाडवी, डॉ. विक्रांत मोरे तसेच वनाधिकारी याबैठकीत उपस्थित होते.
  

Twitter_Aaditya Thackeray 
बैठकीत तोरणमाळच्या विकासाला लवकरात लवकर गती देण्याचे आश्वासन देखील आदित्य ठाकरे यांनी दिले. यावेळी धडगांव तालुकाप्रमुख महेशकुमार पाडवी, युवासेनेचे जिल्हा चिटणीस योगेश पाटील उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0