हेलिकॉप्टर दुर्घटना...अपघाताचे रहस्य उलघडणार 'ब्लॅक बॉक्स'

    दिनांक : 09-Dec-2021
Total Views |
चेन्नई : बुधवारी सकाळी तामिळनाडूतील कन्नूरमध्ये हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या घटनेत देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, घटना घडलेल्या ठिकाणी ब्लॅक बॉक्स मिळाला आहे. या बॉक्समधून अपघात कशामुळे झाला याची माहिती मिळण्याची शक्यता आहे. देशातील एवढ्या मोठ्या पदावरील व्यक्तीचा असा अपघाती मृत्यू होणे ही धक्कादायक बाब आहे. त्यामुळे या घटनेवर विविध स्थरातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परंतु, आता ही घटना नक्की कशामुळे झाली याची माहिती मिळू शकते. कारण घटनास्थळावर ब्लॅक बॉक्स सापडला आहे.
 

durghatana_1  H 
 
 
सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूमुळं संपूर्ण देश हळहळ व्यक्त करत आहे. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी संध्याकाळी सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीची बैठक बोलावली होती. यामध्ये गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि समितीचे इतर सदस्य उपस्थित होते. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. घडलेली घटना अतिशय दुर्देवी आहे. याआधी हवाईदलाचे अध्यक्ष वी. आर. चौधरी यांनी तामिळनाडूचे डीजीपी सी. शैलेंद्र बाबूंसोबत कुन्नूरमध्ये घटनास्थळाची गुरूवारी सकाळी चौकशी केली. हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत यांच्या मृत्यूवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेच्या दोन्ही सभागृहात आज निवेदन देतील. बिपीन रावत यांना यावेळी वेलिंग्टनमध्ये श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. बिपीन रावत यांच्यासह सर्व 13 जणांचे पार्थिव आज दिल्लीत आणली जातील. बिपीन रावत यांच्यावर शुक्रवारी दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.
हे वाचा - 'मी बिपीन रावत'...ठरले शेवटचे शब्द! बचावकर्त्याने सांगितला घटनाक्रम