दिवंगत इरफान खान, तापसी पन्नू फिल्मफेअर पुरस्काराचे मानकरी

08 Dec 2021 16:13:17
tapasi_1  H x W 
 
मुंबई : 2021 हे वर्ष बॉलीवूड उद्योगासाठी पुनरागमनाचे वर्ष होते. दरवर्षीप्रमाणेच यंदादेखील मुंबईत फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यात तापसी पन्नूच्या ‘थप्पड’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला, तर दिवंगत इरफान खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. अजय देवगणच्या ‘तानाजी : द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना सर्वोत्कृट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. अभिनेत्री तापसी पन्नूला ‘थप्पड’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. सैफ अली खानला ओम राऊतच्या ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. प्रीतमला नेटफ्लिक्सवरील ‘लुडो’ चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. ‘मलंग’ चित्रपटातील ‘हुई मलंग’ या शीर्षक गीतासाठी असीस कौरला हा पुरस्कार देण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0