कोण होता हा तंट्यामामा? ज्यांच्या नावावरून इंदूरच्या स्टेशनला नाव दिले जात आहे

    दिनांक : 04-Dec-2021
Total Views |
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षात ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांना 'जळगाव तरुण भारत' चा मानाचा मुजरा...
 
तंट्या भिल्ल यांना ४ डिसेंबर १८८९ रोजी फाशी देण्यात आली होती. आज तंट्याचा स्मरणदिवस. मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सोमवारी इंदूरमधील पातालपानी रेल्वे स्थानकाचे तंट्या भील असे नामकरण करण्याची घोषणा केली. त्याचबरोबर इंदूर बसस्थानकाला तंट्या मामाचे नाव देण्यात येणार आहे. कोण होता हा तंट्यामामा?


Tantya Bhil11_1 &nbs 
 
भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी बिरसा मुंडा ते तंट्या भिल्ल पर्यंत अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आपल्यासाठी यातील बहुसंख्य हुतात्मे अज्ञात आहेत. अशा आजपर्यंत बहुतांशी अज्ञात राहिलेल्या एका हुतात्म्याची आपण आज माहिती करून घेऊ.
 
इतिहासकारांच्या मते, तंट्याचा जन्म भिल्ल जमातीमध्ये 1842 च्या सुमारास मध्यप्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील पांधणा तहसीलच्या बड्डा येथे भाऊसिंगच्या घरी झाला. तंटया भिलचे खरे नाव तांत्या होते, त्यांना प्रेमाने तंट्या मामा म्हणूनही ओळखले जात असे. असे म्हटले जाते की तंट्या म्हणजे भांडण किंवा संघर्ष आणि तंट्याच्या वडिलांनी त्याला हे नाव दिले कारण तो आदिवासींवरील अत्याचाराचा बदला घेण्यासाठी नेहमीच तयार होता. लहानपणी बाण, काठ्या, गोफण चालवण्यात रमलेल्या तंट्याने तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच इंग्रजांविरुद्ध, जमीनदारी प्रथेविरुद्ध बंड करण्यास सुरुवात केली. इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारा सोडणारा भारतीय रॉबिनहूड तंट्या भिल यांनी 1870 ते 1880 च्या दशकात मध्य प्रांतातील 1700 गावांमध्ये आणि बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये ब्रिटिशांविरुद्ध समांतर सरकार चालवले. मामा तंट्याच्या राजवटीत कोणताही आदिवासी उपाशी झोपू शकत नाही, असा समज होता. ब्रिटिशांनी त्याला गुन्हेगार म्हणून संबोधले. तंट्या 12 वर्षे ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढणाऱ्या क्रांतिकारकांपैकी एक म्हणून ओळखला जातो. . अहवालात असे म्हटले आहे की तो गरीब आणि गरजूंमध्ये वाटण्यासाठी ब्रिटिश सरकारच्या खजिन्याची आणि त्याच्या अनुयायांची मालमत्ता लुटत असे. आदिवासी समाज आणि तंट्या भिल्ल सारख्या क्रांतिकारकांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध बंडाचा झेंडा उभारला होता. शेवटी इंग्रजांना तंट्याशी लढण्यासाठी ब्रिटीश सैन्याची खास तुकडी भारतात बोलावावी लागली.
 

Tantya Bhil 2_1 &nbs 
 
इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे 11 ऑगस्ट 1889 रोजी तांत्या आपल्या बहिणीला भेटायला आला होता, तेव्हा तिचा पती गणपत सिंहने त्याला ब्रिटिशांच्या ताब्यात दिले . तंट्या भीलच्या अटकेची बातमी न्यूयॉर्क टाइम्सच्या १० नोव्हेंबर १८८९ च्या अंकात ठळकपणे प्रसिद्ध झाली होती. या बातमीत त्यांचे 'रॉबिन हूड ऑफ इंडिया' असे वर्णन करण्यात आले होते. जबलपूर येथील इंग्लिश सत्र न्यायालयाने 19 ऑक्टोबर रोजी तंट्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याला 4 डिसेंबर 1889 रोजी फाशी देण्यात आली होती. इंदूरजवळील खंडवा रेल्वे मार्गावरील पातालपानी रेल्वे स्थानकाजवळ त्याला फासावर लटकवून फेकण्यात आले होते. ज्या ठिकाणी त्याची चिता रचण्यात आली त्या ठिकाणी तंट्या मामाची समाधी मानली जाते. आजही तंट्या मामाच्या सन्मानार्थ सर्व गाड्या या ठिकाणी क्षणभर थांबतात.
 
जननायक तंट्या मामा भिल्ल उर्फ रॉबिन हूड ऑफ इंडिया…
 
भारतीय स्वातंत्र लढ्याच्या इतिहासाप्रमाणे या आदिवासी भिल्ल क्रांतिकारकांचा इतिहास हि महत्वाचा आहे जो बाकीच्या क्रांतिकारकांच्या प्रमाणे सगळ्यांच्या पुढे आला नाही. बलाढ्य ब्रिटिश सत्तेला सतत अकरा वर्ष सळो कि पळो करणारे हे क्रांतिकारक दुर्लक्षितच राहिले. व त्यांना ब्रिटिश सत्तेने कायम दरोडेखोर याच दृष्टिकोनातून बघितले.
 

Tantya Bhil 3_1 &nbs 
 
एक विलक्षण क्रांतिकारक म्हणजे तंट्या उर्फ तात्या भिल्ल होय. याला ब्रिटिश सरकार कायमच दरोडेखोर म्हणून बघत आले. ब्रिटिशाना सतत ११ वर्ष हुलकावणी देणारा हा क्रांतिवीर १५० वर्षांपूर्वी आदिवासी व शेतकऱ्यांना, सावकार, मालगुजार आणि जुलमी सरकार विरुद्ध पेटून उठण्याची प्रेरणा देणार तंट्या हा आदिवासी – शेतकऱ्यांच्या क्रांतीच पहिला नायक होय. त्याने सातपुड्याच्या दोन्ही भागात – खानदेश व नर्मदा खोऱ्यातील आदिवासी शेतकऱ्यांत राष्ट्रीयत्वाची भावना जागवली. ज्या काळात पुण्यात महात्मा जोतीराव फुले समाज सुधारणेसाठी कार्यरत होते त्याच काळी हा भिल्ल नायक आदिवासी, किसान ह्यांच्या पारतंत्र्याच्या बेड्या झुगारून देण्यासाठी एकाकी लढा देत होता.
 
हा तंट्या भिल्ल अत्यंत साधा भोळा होता त्याची वडिलोपार्जित जमीन कर्जापोटी पाटलाने बळकावली. कर्ज फेडू इच्छिणाऱ्या तंट्याला खोट्या गुन्ह्यात अडकवले शिक्षा भोगून आल्यावर तंट्या भिल्ल मोलमजुरी करू लागला पुन्हा गावकर्यांनी पाटलाच्या मुलीच्या प्रेमसंबंधाचा आरोप ठेऊन हुसकावून लावलं व पुन्हा खोटे आरोप ठेऊन जेल मध्ये डांबले. माणूस म्हणून शांत जीवन जगण्याची धडपड करणाऱ्या तंट्याला जमीन हडप करणारे पाटील-मालगुजार त्यांना साथ देणारे सावकार पोलीस व सर्वच शासन यंत्रणेने जगणे असाह्य केले. अन्यायाने पिचून गेलेला तंट्या बदलत गेला. आपल्या व्यवस्थेशी आणि बलाढ्य ब्रिटिश राजसत्तेशी लढा सुरु केला.
 
जगणे असाह्य झाल्याने तंट्या मालगुजार – सावकारांना लुटू लागला. पोलीस चौक्यांवर हल्ला करू लागला. सत्ताधाऱ्यांना डाकू दरोडेखोर वाटणारा तंट्या हा डाकू नव्हताच. सावकार – मालगुजरांना लुटून तो गरिबांना वाटून टाकी. दुष्काळात सावकारांची आणि सरकारी धान्याची गोदाम फोडून गरिबांना मोफत धान्य वाटू लागला. गरजूना बिनव्याजी कर्ज देवू लागला. स्त्रियांना तो पाठीराखा वाटत होता. गरिबांचा वाली, त्यांचा रक्षणकर्ता, जंगलाचा सार्वभौम राजा अशी त्याची प्रतिमा जनमानसात बनली होती. त्याच्या जिवंतपणीच खानदेश – नर्मदा खोऱ्यात तो एक दंतकथा बनला होता. त्या काळी त्याच्या कथा व गीते घराघरात पोहोचली होती. तंट्याला पकडण्यासाठी १०,५०० रुपये आणि पंचवीसशे एकर जमिनीचे बक्षीस ब्रिटिशांनी देऊ केले होते व त्याच बरोबर होळकरांनी सुद्धा वेगळे बक्षीस ठेवले होते. याच्या वरूनच तंट्या भिल्लाने किती त्रास ब्रिटिश सत्तेला दिला होता हे लक्षात येते. त्याच बरोबर ब्रिटिशांनी तंट्याला पकडण्यासाठी ‘तंट्या पोलीस’ नावाचे स्वतंत्र पोलीस दल स्थापन केले. गावागावात तंबु उभे करून पोलीस चौक्या उभ्या केल्या होत्या. मालगुजार व सावकारांना मोफत शास्त्रे वाटली होती तरीही हा वीर ११ वर्ष पोलिसांच्या हातांवर तुरी देवून डोंगरदऱ्यात तळपत होता.
 
तंट्याचे जीवन मानवतेचे संदेश देणारे होते. त्याच्यात नेतृत्वाचे सगळे गुण होते. तो निस्वार्थी होता. स्वतःसाठी त्याने काही ठेवले नाही. त्याची प्रचंड बुद्धिमत्ता, चपळाई, प्रसंगावधान, दयाळूपणा, सभ्यपणा, न्यायीदृष्टी, उदार दृष्टिकोन या गुणांबद्दलच्या लोककथा – लोकगीते गावोगावी पसरली होती. हे सारे ब्रिटिश तत्कालीन अधिकाऱ्यांनी त्यांच्या पत्रव्यवहारात अहवालात नमूद करून ठेवले आहॆ. ब्रिटिश राजसत्तेच्या काळात निजाम, होळकर, शिंदे व इतर संस्थानिक ब्रिटिश सत्ते बरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होते त्या काळात हा लोकविलक्षण नायक जनाधारावर झुंजत होता ११ वर्ष ब्रिटिश सत्तेच्या तोंडचे पाणी तंट्याने पळविले. ज्या काळात पुण्यात महात्मा जोतीराव फुले समाज सुधारणेसाठी कार्यरत होते त्याच काळात हा भिल्ल नायक आदिवासी-किसान ह्यांच्या पारतंत्र्याच्या बेड्या झुगारून देण्याचा एकाकी लढा देत होता .
 

Tantya Bhil 4_1 &nbs 
 
दुर्दैवाने इतिहासात तंट्याची नोंद एक डाकू व दरोडेखोर अशीच झाली आहे. इतिहास लिहिणाऱ्यांनी गुन्हेगार जातीत जन्मलेल्या तंट्या भिल्लवर हा अन्याय केला. महाराष्ट्रातील लोककथा, लोकनाट्य, पोवाडे आणि लोकगीतातही तंट्या लोकांसमोर येत होता तेही एक डाकू आणि दरोडेखोर हा कपाळावर डाग घेऊनच. एक दशकभर हा क्रांतिवीर बेदखल राहिला त्याची हि एकाकी झुंज आदिवासी स्वातंत्रलढयातील एक सोनेरी पान आहे. भारताच्या १९ व्या शतकाच्या इतिहासात तंटया आणि त्याच्या लढयाला योग्य स्थान मिळेल, अशीही आशा