९४ व्या मराठी साहित्य संमेलनाला नाशिक येथे सुरूवात

    दिनांक : 03-Dec-2021
Total Views |
 

sahitya samelan_1 &n 
नाशिक : 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नाशकात आज ग्रंथ दिंडीने सुरूवात झाली. सलग तीन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ जयंत नारळीकर असून प्रकृती अस्वास्थामुळे अनुपस्थित आहेत. लोकहितवादी मंडळ आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथील भुजबळ नॉलेज सिटी (आडगाव) येथे सुरू झाले. अवकाळी पावसाचे सावट साहित्य संमेलनावर होते. परंतु नाशिकात आज वातावरण चांगले असल्याने साहित्य प्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.