प्रियांकाचा नवरा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

02 Dec 2021 18:12:07
मुंबई : बॉलिवूडमधील प्रियांका चोप्राच्या कामामुळे तिचा नवरा निक जोनास खूप प्रभावित झाला आहे. त्यामुळे आता तो देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अलीकडेच दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये निकने बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याचे सूतोवाच केले आहे. त्याला जर हिंदी सिनेमाची ऑफर मिळाली तर तो नक्कीच त्याचा विचार करेल, असे तो म्हणाला. बॉलिवूडचे सिनेमे खूपच प्रेरणादायी असतात आणि गेल्या 1-2 वर्षात बॉलीवूडमध्ये त्याचे खूप मित्रदेखील झाले आहेत, असेही त्याने सांगितले. बॉलिवूडमधील म्युझिकदेखील खूप छान असते.
nik_1  H x W: 0 
 
मी भारतात असताना नेहमी बॉलिवूडमधील म्युझिक ऐकत असायचो. आमच्या लग्नातही खूप भारतीय म्युझिक आणि बॉलिवूड म्युझिक वाजवले गेले होते. डान्स करायला हे म्युझिक खूप छान असते. आमच्या घरातील पार्ट्यांमध्येही नेहमी हे म्युझिकच असते, असेही निकने सांगितले. निकने यापूर्वी 'जुमांजी- द नेक्‍सट लेव्हल' आणि 'स्क्रिम क्वीन्स'मध्ये काम केले आहे. तसेच बॉलीवूडमधील रोल करायला आवडतील का, असे त्याला विचारल्यावर 'जे मला मदत करतात आणि ज्या लोकांमुळे माझी प्रगती होते, अशांच्या बरोबर काम करायला आवडते.' असे निक म्हणाला.
Powered By Sangraha 9.0