नंदुरबार येथे उभ्या डंपरला ऍपेरिक्षाची धडक ; आरपीएफ जवानासह दोघे ठार

02 Dec 2021 19:12:44
नंदुरबार : रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरला ऍपेरिक्षाने मागावून धडक दिल्याने आरपीएफ जवानासह दोन जण ठार झाल्याची घटना काल रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली.
 
ape_1  H x W: 0
 
नंदुरबार शहरातील भोणे फाट्याजवळ रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास हॉटेल गौरव पॅलेसजवळ डंपर (क्र.एम.एच.१८-८३५१) चालकाने उभे केले होते. रात्रीच्या अंधार असतांना डंपर चालकाने कुठलेही इंडिकेटर अथवा पार्किंग लाईट लावलेले नव्हते. त्यामुळे मागावून आलेल्या एका ऍपेरिक्षा (क्र .एमएच ४१ सी ५४९८) चालकाला उभे असलेले डंपर दिसले नाही. त्यामुळे सरळ ऍपेरिक्षा डंपरवर धडकली. या अपघातात आरपीएफ जवान चरणसिंग गावीत (वय ४९, रा.मंजुळा विहार, दुधाळे शिवार नंदुरबार) व प्रवीण अंबालाल परदेशी (वय ३८) यांना गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी दोघांना तपासून मृत घोषित केले. अपघातात ऍपेरिक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मृत आरपीएफ जवान चरणसिंग गावीत दोंडाईचा येथे नोकरीला असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0