भारतात प्रसिद्ध पुण्याचे "मिसळ दरबार" जळगावात

18 Dec 2021 20:40:08
जळगाव : जळगावकरांच्या सेवेत आजपासून अस्सल महाराष्ट्रीयन तडका म्हणजेच मिसळ दरबार ची खास मिसळ घेऊन आम्ही येत आहोत. यात १८ प्रकारच्या वेगवेगळ्या मिसळचाही समावेश आहे अशी माहिती येथील एम जे कॉलेज सामोर झालेल्या पत्रपरिषदेत ’मिसळ दरबार’चे मिसळ दरबारचे संस्थापक संचालक सचिन विंचवेकर यांनी दिली.सोबत या दालनाचे व्यवस्थापक योगराज चौधरी व त्यांच्या पत्नी निशा चौधरी होते.
misal_1  H x W: 
 
जळगावला मिसळ दरबारच्या दालनाचे उद्घाटन एम जे कॉलेज समोर आज पालकमंत्री ना गुलाबराव पाटील व आ गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे.मराठी पदार्थांना एक ब्रँड म्हणून लोकांसमोर आणण्याचं आणि त्यांना जागतिक पातळीवर पोहोचवण्याचं उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेवून आज या मिसळ दरबारचे माध्यमातून पुणे येथील डायरेक्टर सचिन विंचवेकर यांचा प्रवास सुरू आहे. ते मुळचे जळगांव येथिल असुन त्यांनी त्यांच्या ध्येयानं १८ प्रकारच्या मिसळला योग्य पध्दतीनं सर्व्ह करण्याचा प्रयत्न केलाय. यात नवनवीन असे १८ प्रकारच्या मिसळीचा आस्वाद जळगावकरांना घेता येणार आहे.
 
सध्या मिसळ दरबारच्या महाराष्ट्रात,पुणे, बारामती, फलटण, कर्जत, नासिक, मंचर,विरार, कांदीवली, वसई, अमरावती,नागपुर,जळगांव येथे दालन सुरु आहे, लवकरच शिर्डी तर गुजरात,अहमदाबाद,भावनगर येथेही मिसळ दरबारची दालन असुन लवकरच उत्तर प्रदेश येथे मिसळ दरबारची दालने सुरु होणार असल्याची माहीती मिसळ दरबार पुणेचे संस्थापक संचालक सचिन विंचवेकर यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0