अबू धाबीत रंगणार आयफा सोहळा

15 Dec 2021 16:59:48
मुंबई : चित्रपटसृष्टी फिल्मफेअरइतकेच लोकप्रिय ठरलेले आयफा पुरस्कार कधी घोषित होतात याची सर्वांनाच वाट असते. यावेळी हा पुरस्कार वितरण सोहळा 18 आणि 19 मार्च 2022 या काळात अबू धाबी येथे होणार असून, याचे संचालन अभिनेता सलमान खान करणार आहे.
 
 
ifa_1  H x W: 0
 
अबू धाबीतील सांस्कृतिक तसेच पर्यटन मंत्रालयाच्या मदतीने याचे आयोजन होणार आहे. अरब देश नेहमीच सिनेकलावंतांसाठी आकर्षण राहिले आहेत. त्यातही आयफा पुरस्कारामुळे देशाबाहेरील बॉलीवूडप्रेमींनाही आपल्या लाडक्या कलाकारांना भेटण्याची संधी मिळत असते.
 

ADVT_1  H x W:  
Powered By Sangraha 9.0