कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांच्या कुटुंबांना पालिकेने कर माफीसह आर्थिक मदत द्यावी

12 Dec 2021 17:06:48
नंदुरबार : कोरोना महामारीत मृत्यु झालेल्यांच्या कुटुंबांना नंदुरबार नगरपालिकेतर्फे घरपट्टी, पाणीपट्टी व नगरपालिकेचे सर्व प्रकारचे कर माफ करुन त्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी नंदुरबार शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे युवानेते ऍड.राऊ मोरे व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नंदुरबार शहराध्यक्ष लल्ला मराठे यांनी पालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष रवींद्र पवार यांना दिले.
 
ndb_1  H x W: 0 
 
मागील पावणे दोन वर्षात कोरोनाच्या महामारीमुळे देशात मोठे नुकसान झाले आहे. अनेकांनी तर आपला कुटुंबप्रमुखच गमावला आहे. अशा कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. अशातच देशात सर्वत्र महागाईने जनता होरपळून निघाली आहे. अशा परिस्थितीत कोरोनामुळे मृत पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबाला उदरनिर्वाह व जीवन जगणे जिकरीचे झाले. काही कुटुंबातील कर्ते पुरुषच कोरोना महामारीला बळी पडल्यामुळे काही कुटुंब तर अक्षरशः रस्त्यावर आल्यासारखे झाले आहे. त्यामुळे नंदुरबार नगरपालिकेने आपल्या स्तरावरुन अशा कुटुंबाप्रती सहानुभूतीपूर्वक विचार करुन घरपट्टी, पाणीपट्टी व नगरपालिकेचे सर्व प्रकारचे कर माफ करुन त्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी नंदुरबार शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे करण्यात आली आहे. निवेदन देतेप्रसंगी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नाना माळी, सुरेश वळवी, कालु पहेलवान, प्रमोद महाजन, लाला बागवान, जयेश मोरे, अदनाम मेमन आदी उपस्थित होते.
 
 
Powered By Sangraha 9.0