अथियाने घातले के.एल.राहुलचे कपडे

    दिनांक : 12-Dec-2021
Total Views |
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू के. एल. राहुल हे दोघेही एकमेकांना डेट करत असून त्यांनी रिलेशनशिपची अधिकृत घोषणाही केली आहे. तसेच सोशल मीडियावर सध्या दोघांचा एक फोटो व्हायरल होत आहे. यात अथियाने तिच्या बॉयफ्रेंडचे हुडी परिधान केल्याचे दिसत आहे. यामुळे या फोटोंची प्रचंड चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी अथियाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता. यात तिने काळ्या रंगाचा प्रिंट असलेला एक टी शर्ट परिधान केला होता. तर काही दिवसांपूर्वी त्यासारख्याच रंगाचा प्रिंट असलेला एक टी शर्ट के. एल. राहुलने परिधान केला होता.
 
k.l_1  H x W: 0
 
यामुळे या दोघांच्याही फोटोखाली सेम टी शर्ट अशी कमेंट अनेक नेटकरी करताना दिसत आहे. हे दोन फोटो बघता अथिया आणि राहुल हे दोघेही एकमेकांचे वॉर्डरोब शेअर करताना दिसत आहेत. तसेच यात त्या दोघांनाही फार आरामदायी वाटत असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, अथिया ही अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी असून तिने 2015 बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. तिने हीरो चित्रपटात पहिल्यांदा काम केले. तसेच ती मुबारक आणि मोतीचूर चकनाचूर या चित्रपटांतही झळकली आहे.