माधुरी दीक्षित राहणार भाड्याच्या घरात

04 Nov 2021 13:53:43
मुंबई: आपल्या लग्झरी लाइफमुळे बॉलिवूड कलाकार हे विशेष ओळखले जातात. त्यांच्या गाड्या, आलिशान घरे तसेच त्यांनी परिधान केलेले कपडे देखील कायम चर्चेत असतात. बॉलिवूडची 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितने आता मुंबईत एक अपार्टमेंट भाडे तत्वावर घेतले आहे. या अपार्टमेंटचे भाडे ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. मुंबईत एक अपार्टमेंट माधुरीने भाडे तत्वावर घेतले आहे. तिन वर्षांसाठी माधुरीने हे घर घेतले आहे. मुंबईतील इंडियाबुल्स ब्ल्यूमध्ये हे अपार्टमेंट आहे. २९व्या मजल्यावर असलेल्या या अपार्टमेंटचे जवळपास १२.५ लाख रुपये भाडे आहे. हे अर्पाटमेंट ५५०० क्वेअर फीटमध्ये आहे.
 

madhuri_1  H x  
 
या अपार्टमेंटसाठी माधुरीने जवळपास ३ कोटी रुपये डिपॉजिट म्हणून जमा केले आहेत. माधुरीच्या या अपार्टमेंटला जवळपास पाच कार पार्किंगची जागा देण्यात आली आहे. माधुरी काही दिवसांपूर्वी 'डान्स दीवाने' या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून दिसत होती. तसेच तिने आलिया भट्ट आणि वरुण धवन स्टार 'कलंक' या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. ती अनिल कपूरसोबत 'टोटल धमाल' या चित्रपटात देखील दिसली होती.
Powered By Sangraha 9.0