मुंबई : छोट्या पाड्यावरील लोकप्रिय 'द कपिल शर्मा शो' नेहमीच कलाकारांचा हजेरीमुळे चर्चेत असतो. या शो मध्ये प्रत्येक बॉलीवूड कलाकार हजेरी लावत असून या शो ला भारतातच नव्हे तर जग भारतातील लोक आवडीने पाहत असतात. या शोच्या माध्यमातून अनेक बॉलीवूड सेलेब्स आपल्या चित्रपटाची जाहिरात करीत असतात. किंवा प्रोमोशन करीत असतात. या शो तील प्रत्येक भाग नेहमीच त्यातील कॉमेडीमुळे प्रेक्षकांच्या पसंती येतो आणि चर्चेचा भाग असतो. मात्र यावेळी हा शो कलाकारांच्या हजेरी किंवा त्यातील कॉमेडी मुळे नव्हे तर भलत्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.
झाले असे की, सध्या पंतप्रधान मोदींच्या मंत्रीमंडळाच्या सदस्य असणाऱ्या स्मृती इराणी त्यांच्या 'लाल सलाम' या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी या शोवर येणार होत्या. त्यासाठी त्या सेटवर पोहचल्या मात्र तिथे प्रवेश द्वारावर त्यांना सुरक्षा रक्षाकडून अडवण्यात आले. यावेळी सुरक्षा रक्षक आणि इराणी यांचा कार ड्राइवर यामध्ये चांगलाच वाद झाला. या वादामुळे इराणी यांना प्रवेशद्वारावर फार वेळ वाट पाहावी लागली. त्यामुळे स्मृती इराणी यांनी चिडून परतण्याचा निर्णय घेतल्याने शुटिंग रद्द करावं लागलं. कपिल शर्मा आणि प्रोडक्शन हाऊसला यासंदर्भातील माहिती मिळाली तेव्हा त्यांनी स्मृती इराणी यांची माफी मागत त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र स्मृती इराणी यांनी शूटींग न करण्याचा आपला निर्णय कायम ठेवला.