मुंबई : प्रियांका चोप्राने पती निक जोन्सचे नाव आपल्या नावासमोरून हटवल्याची पोस्ट करताच, या दोघांचा घटस्फोट होणार की काय, अशी जोरदार चर्चा सुरू झाली. मात्र, प्रियांकाने केवळ नाव हटवले आहे, आमच्यात सारे काही आलबेल आहे, असे सांगत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तिच्या आईनेही याविषयी स्पष्टीकरण देत मुलगी-जावई सुखाने नांदत आहेत. त्याच्याविषयी अफवा पसरवू नका, असे ट्विट केले आहे.