शिल्पा शेट्टीने सुरु केले रेस्टॉरंट

    दिनांक : 20-Nov-2021
Total Views |
मुंबई : कलाकार मंडळी मालिका आणि सिनेमात अभिनय करण्याबरोबरच इतर गोष्टींमध्येही विशेष लक्ष देऊ लागले आहेत. अभिनयासह स्वतःचा बिझनेस सुरु करण्याचा हा ट्रेंड हा पूर्वीपासून सुरु आहे. अभिनयासोबत स्वतःचा बिझनेस असणारे कलाकारांची यादीही मोठीच आहे. यादीत आता आणखीन एका अभिनेत्रीचे नाव गणले जाणार आहे.ती अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी.
 
 

shilpa_1  H x W

 
नुकतेच शिल्पा शेट्टीने मुंबईत रेस्टॉरंट सुरु केले आहे. मध्यंतरी तिने रेस्टॉरंटचे खास फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. ज्या भागात हे रेस्टॉरंट आहे त्याच परिसरात सगळ्यात जास्त सेलिब्रेटी राहतात. नुकतेच सुरु झालेल्या या रेस्टॉरंटमध्ये खुद्द शिल्पा शेट्टीच जेवण वाढताना दिसली. वेगवेगळे पदार्थ बनवणे आणि ते खाऊ घालणे हा तिचा एक आवडता छंदच या छंदाचे व्यवसायात आता तिने रुपांतर केले आहे.
शिल्पाचे जेवण वाढतानाचे फोटोही समोर आले आहेत. एरव्ही आपण शिल्पाला वेगवेगळ्या गोष्टी करताना पाहिले आहेत. या फोटोंना चाहत्यांनी लाईक्स करत पसंती देत असल्याचे पाहायला मिळत आहे. रेस्टॉरंटच्या पहिल्याच दिवशी खूप गर्दीही झाली होती.अनेक सेलिब्रेटींनीसुद्धा पहिल्याच दिवशी हजेरी लावली होती. शिल्पाला प्रत्यक्ष भेटून तिला शुभेच्छाही दिल्या.
शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह राहिल्यामुळे चर्चेत असते. ती तिच्या चाहत्यांसोबत खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. शिल्पाने इन्स्टाग्रामवर आपल्या नवीन रेस्टॉरंटचे फोटो पोस्ट केले होते. त्यावेळी रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा या हॉटेलमध्ये खाण्याची मजा लुटताना फोटोमध्ये पाहायला मिळाले होते. शिल्पा शेट्टीचे नवीन रेस्टॉरंट खूपच आलिशान आहे.