शरीरसौष्ठव क्षेत्रात नंदुरबारच्या विपूल राजपूत यांनी रचला इतिहास

18 Nov 2021 19:24:10
नंदुरबार : येथील एच.जे.पी. फिटनेस क्लबचे मुख्य संचालक विपुल हेमंतसिंह राजपूत यांनी तेलंगाना (हैदराबाद) येथील नरेश सूर्या क्लासिक एक्स्पो-२०२१ आयोजित राष्ट्रीय बॉडीबिल्डिंग स्पर्धेत कास्यपदक पटकावून आणखी एक भव्य यशाचा तुरा खोवला. पुणे ‘श्री’ च्या अशाच मोठ्या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करून विपूल यांनी काही महिन्यांपूर्वीच आपला झेंडा रोवला आहे. 
vipul_1  H x W:
 
त्यापाठोपाठ मिळवलेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील यशा मुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्वत: विपुल राजपूत यांनी याविषयी सविस्तर माहिती देताना सांगितले की, हैदराबाद येथे नरेश सूर्या क्लासिक एक्स्पो -२०२१-२२ ही राष्ट्रीय पातळीवरील बॉडी बिल्डिंग स्पर्धा म्हणजे शरीर सौष्ठव स्पर्धा नुकतीच पार पडली. ८० ते ९० किलो वजनाच्या गटात भाग घेतला होता. यात देशभरातून विविध राज्यातील ४०० हून अधिक स्पर्धक उपस्थित होते. ही स्पर्धा तीन दिवस चालते. वेगवेगळ्या चाचण्या तपासण्या आणि अंतिम सादरीकरण अशा टप्प्यात तीन दिवस स्पर्धा चालते. यादरम्यान स्पर्धकाचे मसल, फिटनेस, शार्पनेस, डाएट कंट्रोल आणि शारीरीक सादरीकरण यांच्या निकषावर आधारित गुण देऊन परीक्षक निवड घोषित करतात. या सर्व स्तरावर ४५० जणांमधून योग्यता सिद्ध करता आली आणि तिसर्‍या क्रमांकाचे कास्य पदक प्राप्त केले. विपुल राजपूत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.
विपुल राजपूत म्हणाला की, पुणे येथील जीटी फिटनेस क्लबचे सर्वेसर्वा गणेश बोद्दुल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विपुल राजपूत हे मागील काही वर्षापासून अथक परिश्रम घेत होते. तेव्हापासून त्यांची स्पर्धेत यशमिळविण्याची जिद्द होती. अखेर त्यासाठी लागणारे सर्व परफॉर्मन्स ठणठणीत पणे दर्शवत सादर करीत विपुल राजपूत यांनी बाजी मारली आणि आयोजकांनी त्यांची प्रथम क्रमांकाने निवड करीत असल्याची दणदणीत घोषणा केली. असे यश मिळवण्यासाठी अनेक लोकांना मोठ्या देणग्या देऊन अथवा बड्या हितसंबंधांना हाताशी धरून पडद्यामागच्या हालचाली कराव्या लागतात. परंतु विपुल राजपूत यांनी फक्त आणि फक्त अंगच्या मेहनतीवर आणि गुणवत्तेवर हे स्थान पटकावले आहे. ही सर्वात अभिमानाची बाब ठरली आहे.
Powered By Sangraha 9.0