मुंबई : हॉलिवूड स्टार ड्वेन जॉन्सन सध्या त्याच्या आगामी 'रेड नोटीस' चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आहे. 'द रॉक' नावाने प्रसिद्ध असलेल्या ड्वेन जॉन्सनचा हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. याचदरम्यान एका मुलाखतीत त्याने बॉलीवूडमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. ड्वेन जॉन्सन म्हणाला, आतापर्यंत मला कधीही बॉलीवूडमधील चित्रपटाची ऑफर आलेली नाही.
परंतु भविष्यात मला ऑफर आल्यास निश्चित त्यावर विचार करण्यात येईल. मनोरंजन जगातमध्ये हॉलीवूड आणि बॉलीवूडमधील दोन मोठ्या इंडस्ट्री आहेत. आपण अधिक व्यापक विचार करून काम केल्यास निश्चित फायदा होईल. यासाठी मी आतापासूनच तयार असल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, ड्वेन जॉन्सनची भारतातदेखील जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटाचा भारतातून चांगला प्रतिसाद मिळत असतो. तसेच बॉलीवूडमधील अनेक सेलेब्सही त्याचे चाहते आहेत.