सुयश-आयुषीने घेतले खंडेरायाचे दर्शन

    दिनांक : 10-Nov-2021
Total Views |
 

suyash_1  H x W 
 
 
मुंबई : मराठीतील अभिनेता सुयश टिळक याने नुकतंच पत्नी आयुषी हिच्यासोबत खंडेरायाच्या गडावर भेट दिली. जेजुरी गडावर झालेली भंडाऱ्याची उधळण, तिथलं संपूर्ण वातावरण थोडक्यात, संपूर्ण सोन्याची जेजुरी त्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला आणली. काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकलेल्या या अभिनेत्यानं जेजुर गडाच्या पायथ्याशी जाताच तिथं पत्नीला उचलून घेतलं आणि दर्शनासाठी तो पुढे सरसावला. त्यानं असं केलं, आणि या क्षणांचे काही व्हिडीओ समोर आले. खुद्द या अभिनेत्यानंही त्या वेळचा व्हिडीओ पोस्ट केला होता. सुयशनं पोस्ट केलेल्या फोटोंना सर्वांनीच पसंती दिली. त्याच्या काही कलाकार मित्रांनीही त्याच्या पोस्टवर कमेंट केल्याचं पाहायला मिळालं. इथं मंदिरात येतेवेळी गडाच्या किमान पाच पायऱ्या तरी पतीनं पत्नीला उचलून घ्यावं आणि गड चढावा अशी प्रथा आहे.