शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार 50 % सब्सिडी, असा घ्या फायदा

09 Oct 2021 15:28:55
नवी दिल्ली : PM Kisan TractOr Yojana: केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि आर्थिक मदत करण्यासाठी अनेक योजना सुरू करीत आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 6 हजार रुपये जमा केले जातात. शेतकऱ्यांना शेतीसाठी यंत्रांची गरज पडते. त्यामुळे केंद्र सरकारने ट्रॅक्टर खरेदीवर सब्सिडी सुरू केली आहे. ही सब्सिडी पीएम किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत दिली जाते.,

modiji_1  H x W
शेतकऱ्यांना शेतीसाठी ट्रॅक्टरची मोठी मदत होते. परंतु देशात असे अनेक शेतकरी आहेत. ज्यांची आर्थिक स्थिती कमकूवत असल्याने ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाही. अशा स्थितीत त्यांना ट्रॅक्टर भाडे तत्वावर घावे लागते. किंवा बैलांचा उपयोग करावा लागतो. अशातच सरकारने मदतीसाठी योजना आणली आहे. पीएम किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना निम्म्या किंमतीत ट्रॅक्टर मिळवून देईल.
50 टक्क्यांपर्यंत सब्सिडी
शेतकऱ्यांना ट्र्रॅक्टर खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने सब्सिडी (PM Kisan Tractor Yojana) सुरू केली आहे. ज्याअंतर्गत कोणत्याही कंपनीचे ट्रॅक्टर शेतकऱ्यांना निम्म्या किंमतीत खरेदी करता येणार आहे. उर्वरित रक्कम सरकारकडून सब्सिडी म्हणून मिळते. याशिवाय राज्य सरकारे देखील ट्रॅक्टर्सवर 20 ते 50 टक्क्यांपर्यंत सब्सिडी देत असते.
असा उठवणार योजनेचा लाभ
ही सब्सिडी सरकारच्या वतीने एकाच ट्रॅक्टरच्या खरेदीवर मिळते. जर तुम्ही योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्र म्हणजेच आधार कार्ड, जमीनेचे कागदपत्र, बँकेच्या डिटेंल्स, पासपोर्टसाईज फोटो असायला हवे. जवळच्या CSC केंद्रावर जाऊन ऑनलाईन अप्लाय करता येईल.
Powered By Sangraha 9.0