प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांची अफगाणिस्तानचे सल्लागार म्हणून नियुक्ती

09 Oct 2021 17:25:45
काबूल : टी -20 विश्वचषक सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असून, या स्पर्धेसाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. अफगाणिस्तान संघाला प्रशिक्षक अँडी फ्लॉवरची साथ मिळाली आहे, ज्यांनी या मोठ्या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी इंग्लंडला टी -20 चॅम्पियन बनवले होते. झिम्बाब्वेचे माजी कर्णधार आणि इंग्लंडचे माजी प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांची टी -20 विश्वचषकासाठी अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय संघाचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
afaga_1  H x W:
 
प्रशिक्षक अँडी फ्लॉवरने २०१० मध्ये इंग्लंडला टी २० विश्वचषक विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2009 ते 2014 पर्यंत ते इंग्लंडचे प्रशिक्षक होते. फ्लॉवरने आयपीएल, सीपीएलसह अनेक लीगमध्ये संघांचे प्रशिक्षक आहेत. अँडीने आमच्या अनेक खेळाडूंसोबत विविध फ्रँचायझी स्पर्धांमध्ये काम केले आहे आणि त्याचा अफाट अनुभव वर्ल्डकपमध्ये संघाला मदत करण्यासाठी खूप फायदेशीर आणि उपयुक्त ठरेल. अँडी एसीबीमध्ये सामील झाल्याचा आम्हाला आनंद आहे, असे एसीबीचे अध्यक्ष अजीजुल्लाह फाजली यांनी एका निवेदनात सांगितले आहे.
फ्लॉवर झिम्बाब्वेसाठी 63 कसोटी आणि 213 एकदिवसीय सामने खेळला आहे. त्यानंतर त्याने कोचिंगमध्ये पाऊल ठेवले. इंग्लंड व्यतिरिक्त, त्याने आयपीएल, सीपीएल, पीएसएल, द हंड्रेडसह अनेक भिन्न फ्रँचायझी संघांसह प्रशिक्षक म्हणूनही काम केले. अफगाणिस्तान संघ 6 ऑक्टोबर रोजी काबुलहून कतारला रवाना झाला होता. टी -20 विश्वचषकात मोहम्मद नबी अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व करणार आहे. हवामानाशी सुसंगत राहण्यासाठी संघाने कतारमध्ये प्रशिक्षण सुरू केले आहे. ते यूएईच्या व्हिसाची वाट पाहत आहेत आणि प्रत्येकजण विश्वचषकासाठी सज्ज आहे.
Powered By Sangraha 9.0