सुकन्या समृद्धी योजनेद्वारे मुलींचे भविष्य उज्ज्वल करा

09 Oct 2021 17:50:56
जळगाव :  सुकन्या समृद्धी योजना किंवा सुकन्या समृद्धी खाते ही भारत सरकारची नवजात कन्यांच्या पालकासाठी राबविल्या जात असलेली एक योजना आहे. या योजनेस भारत सरकारचे पाठबळ आहे. ही योजना नवजात कन्येच्या पालकांना त्या मुलीचे शिक्षणासाठी व लग्नासाठी फंड जमा करण्यासाठी प्रोत्साहन देते.
 

sukanya_1  H x  
 
 
प्रधानमंत्री नरेंद्र मोदीद्वारे दि. २२ जानेवारी २०१५ला या योजनेचे विमोचन करण्यात आले. सध्या या योजनेवर मिळणारे व्याज हे ८.६% इतके आहे. या योजनेत कर लाभ देखील आहे. या योजनेचे खाते कोणत्याही डाक कार्यालयात अथवा कोणत्याही अधिकृत बँकेच्या शाखेत उघडल्या जाऊ शकते.
 
 
योजनेची वैशिष्ट्ये
१) सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत १० वर्षे किंवा त्याहून कमी वयाच्या मुलीच्या नावे बँकेत अथवा पोस्ट ऑफिसमध्ये 'सुकन्या समृद्धी' खाते उघडता येते, यात किमान १०००रु ठेवावे लागतात. एका आर्थिक वर्षात या खात्यात कमाल १.५ लाख रु टाकता येतात.
२ ) खाते उघडल्यानंतर २१ वर्षापर्यंत किंवा मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिचे लग्न करावयाचे असल्यास (जी मुदत आधी असेल ती) व्याजासह ठेवी परत मिळतात.
३) १८ वर्षे वयानंतर शिक्षणासाठी ५०% रक्कम काढण्याची मुदत असते उर्वरित रक्कम पुढे केव्हाही (२१ वर्षे मुदत संपेपर्यंत) काढ़ता येईल.
-

Powered By Sangraha 9.0