आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'वर्तुळ'

    दिनांक : 09-Oct-2021
Total Views |
मुंबई : अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, परंतु आजच्या धकाधकीच्या जगात माणूस संपूर्ण अडकून गेला आहे. पैशांच्या मागे लागताना खरं सुख म्हणजे नेमके काय असते? याचा त्याला विसर पडला आहे. श्रीमंत माणसे अधिक श्रीमंत होत आहेत, तर गरीब हे आणखी गरिबाकडे झुकले आहेत. त्यात गावाकडच्या लोकांची भीषण अवस्था आहे. शहरात मुबलक पाणी, वीज आणि इतर व्यवस्था आहेत. याउलट गावाकडे कुठल्याही सुखसुविधा नाहीत. चालायला नीटसे रस्तेदेखील नाहीत. पावसाळ्यात गावी राहणाऱया लोकांची वाट ही एकदम बिकट होऊन जाते.अशाच एका गावातील भीषण परिस्थितीचा आढावा 'वर्तुळ' या माहितीपटात मांडला आहे.
f_1  H x W: 0 x
 
त्या गावातील लोकांनी व्यक्त केलेली मनोगते ही भयानक आणि तितकीच वास्तव आहेत. त्यामुळे त्यांचे 'वर्तुळ' कधी पूर्ण होईल अशा आशयाचा हा माहितीपट आहे. काव्या ड्रीम मुव्हीज व किरण निनगुरकर यांनी 'वर्तुळ' या माहितीपटाची निर्मिती केली आहे. या माहितीपटातून लोकांचे प्रश्न, सामाजिक समस्या, जाणिवा, कला, संस्कृती, ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान यांसारख्या अनेक विषयांवर भाष्य करण्यात आले आहे. या माहितीपटाची संकल्पना, लेखन व दिग्दर्शन आशीष निनगुरकर यांचे आहे, तर सिद्देश दळवी यांनी छायाचित्रण केले आहे. दुसऱया रिल्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'वर्तुळ' या माहितीपटाची निवड झाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.