आईच्या वाढदिवशी जेलबाहेर येणार का आर्यन खान?

08 Oct 2021 15:20:58
मुंबई : मुंबईहून गोव्याकडे जाणा-या क्रूझवर ड्रग्स पार्टीप्रकरणीअटक करण्यात आलेला शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानची काल गुरुवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. यादरम्यान आरोपींना कारागृहात न पाठवता एक दिवस एनसीबी कोठडीतच ठेवण्याची विनंती बचावपक्षाकडून करण्यात आली आणि न्यायालयाने ती मान्यही केली. त्यानंतर आज आर्यनच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. आज 
आर्यनची आई गौरी खान हिचा वाढदिवस. त्यामुळे आईच्या वाढदिवशी आर्यन तुरूंगातून बाहेर येतो की तुरुंगातील त्याचा मुक्काम आणखी वाढतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
 
aaryan_1  H x W 
आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणीस सुरु. कालच्या सुनावणीत एनसीबीने कोर्टाकडे आर्यन व त्याच्या दोन साथीदारांची कोठडी 11 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्याची मागणी केली होती. तथापि न्यायमूर्ती आर एम नेर्लीकर यांनी कोठडी वाढवण्याची मागणी करणारी एनसीबीची याचिका फेटाळून लावली. आर्यन खान, मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्जेंट यांना एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी गोव्याच्या क्रूझवर छापेमारीदरम्यान अटक केली होती. तर उर्वरित पाच जणांना दुस-या दिवशी अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत १६ जणांना अटक करण्यात आली आहे. अब्दुल कादिर शेख, श्रेयस नायर, मनीष दर्या आणि अविन साहू अशी या नव्या आरोपींची नावे असून त्यांना मंगळवारी मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टात हजर करण्यात आले. त्यांना 11 ऑक्टोबररपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे.
इतर आठ जणांमध्ये आर्यन खान, अरबाज सेठ मर्चंट, मुनमुन धामेचा, विक्रांत चोकर, इस्मीत सिंग, नुपूर सारिका, गोमित चोप्रा आणि मोहक जसवाल यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने क्रूझचे सीईओ जुर्गन बेलोम यांना पुन्हा समन बजावत चौकशीसाठी बोलावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रूझवर आणखीही काही लोक ड्रग्स घेत असल्यासंदर्भात तपास केला जात आहे. दरम्यान, सोमवारी रात्री एनसीबीनं मुंबईतील गोरेगाव परिसरात धाड टाकली होती. यामध्ये दोन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0