राशिद खानने वैयक्तिकरित्या रचला इतिहास

30 Oct 2021 13:07:15
दुबई : टी- 20 वर्ल्डकप स्पर्धेमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव झाला. मात्र या सामन्यात राशिद खानने वैयक्तिकरित्या इतिहास रचला आहे. राशिदने T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 100 बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे.
अफगाणिस्तान

rashid_1  H x W
 
 
पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात राशीद खानने आपल्या 53व्या सामन्यात मोहम्मद हाफिजला बाद करून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शंभर विकेट्स पूर्ण केल्या. राशीदच्या आधी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 किंवा त्याहून अधिक विकेट घेणारे तीनच गोलंदाज होते. लसिथ मलिंगा, शकिब अल हसन आणि टिम साउथी हे तीन गोलंदाज आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 100 किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत. क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये 100 बळी घेणारा राशीद हा जगातील चौथा गोलंदाज ठरला आहे.
आंतरराष्ट्रीय T-20 मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विचार केला तर हा विक्रम बांगलादेशच्या शाकिब अल हसनच्या नावावर आहे. शाकिबने 94 सामन्यात 117 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान 20 धावांत पाच बळी घेणं ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत लसिथ मलिंगा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 83 टी-20 सामन्यात 107 विकेट घेतल्या. तर राशिद खान 101 विकेट्ससह तिसर्‍या आणि टीम साऊदी 100 विकेटसह चौथ्या क्रमांकावर कायम आहे.
Powered By Sangraha 9.0