फैजपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी नयना चौधरी

    दिनांक : 08-Sep-2020
Total Views |

faijpur _1  H x
बिनविरोध ऑनलाईन पद्धतीने निवड, उपस्थितांकडून स्वागत
वृत्तसेवा
फैजपूर, ता.यावल, ८ सप्टेंबर
येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सत्तारुढ गटातील तथा प्रभाग क्रमांक ३ अ गटातील अपक्ष नगरसेविका नयना चंद्रशेखर चौधरी यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पीठासीन अधिकारी तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी नगर परिषद सभागृहात झालेल्या ऑनलाइन बैठकीमध्ये केली आहे. यावेळी नपा सभागृहात झालेल्या ऑनलाइन बैठकीत पीठासीन अधिकारी यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी नयना चंद्रशेखर चौधरी यांचे प्रत्येकी दोन अर्ज दाखल झाले होते. यांना अनुमोदक सूचक म्हणून भाजपा गटनेते मिलिंद वाघुळदे, कॉंग्रेस नगरसेवक देवेंद्र बेंडाळे यांनी केले. त्यामुळे पीठासीन अधिकारी यांनी नयना चंद्रशेखर चौधरी यांची फैजपुर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध झाल्याची घोषणा केली.
नवनियुक्त उपनगराध्यक्ष नयना चंद्रशेखर चौधरी यांचा स्वागत सत्कार व शुभेच्छा नगराध्यक्ष महानंदा रवींद्र होले, पीठासीन अधिकारी तहसीलदार जितेंद्र कुवर मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. भाजपा गटनेते मिलिंद वाघुळदे ,माजी नगराध्यक्ष नगरसेविका अमिता चौधरी, नगरसेवक हेमराज चौधरी, नगरसेवक केतन किरंगे, कलीम खान मनियार, देवेंद्र बेंडाळे, प्रभाकर सपकाळे, देवेंद्र साळी, वसला कुंभार, रघुनाथ कुंभार, कॉंग्रेस शहराध्यक्ष रियाज मेंबर आदींनी शाल, पुष्प देऊन स्वागत केले.
एकमेकांना पुष्पमाला घालून आनंदोत्सव
याप्रसंगी सभागृहातच नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा नयना चौधरी व त्यांचे पती चंद्रशेखर देविदास चौधरी यांनी एकमेकांना पुष्पमाला (वरमाला) घालून आनंद व्यक्त केला. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हर्षा उमटला. या क्षणाला सर्वांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष नयना चौधरी यांनी सत्कारार्थी मनोगतात आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच या पदावर आरूढ होता आले. त्याबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त करत सर्वांच्या खांद्याला खांदा लावून शहरवासीयांच्या सर्वांगीण विकास तथा सेवाकार्य अधिकाअधिक जोमाने करू असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे