विद्यार्थ्याच्या अंगावरून झोपेत मण्यार सर्पाचा संचार

    दिनांक : 08-Sep-2020
Total Views |

dahigaon_1  H x
देव तारी त्याला कोण मारी : दहीगावात चौदा वर्षीय मुलगा सुदैवाने बचावला
दहिगाव ता यावल : येथील पाटील वाड्यात १४ वर्षीय विद्यार्थ्यांच्या अंगावरून मण्यार जातीचा साप फिरून गेल्यावरही ही तो सुखरूप राहिला. तत्काळ सर्पमित्राला पाचारण करून त्याला पकडण्यात आले. सुदैवाने त्या विद्यार्थ्यांचे प्राण वाचल्याने देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय आला. दहिगाव येथील पाटील वाड्यात ७ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास नितीन पाटील यांच्या घरात त्यांचा मुलगा राज नितीन पाटील इयत्ता आठवी (वय १४) हा त्याच्या आई व भाऊ समवेत खाली झोपला होता. झोपेत त्याच्या अंगावरून मण्यार जातीचा विषारी दोन फुटाचा साप गेल्याचे चाहूल लागलाच त्याने त्याला पायाने हटविले. किंकाळी मारली.
 
तत्काळ त्याची आई भाऊ वडील जागी झाले. साप घरातील कपाटाच्या आडोशाला जाऊन दडलेला होता. गावातील सर्पमित्र शेखर नामदेव अडकमोल व अजय बाळू अडकमोल यांना शेजारच्यांनी त्वरित बोलाविले अवघ्या पंधरा मिनिटात दोघं राजकडे आले आणि दडलेल्या सापाला पकडले. हा साप विषारी असून त्याला कुठलाही स्पर्श सहन होत नाही. स्पर्श झाल्यावर तात्काळ तो दंश मारतो आणि त्वरित त्या व्यक्तीचे निधन होते अशी याची आख्यायिका आहे.
 
विशेष हा रात्रीच्या वेळी हिंडत असतो, असे सर्पमित्र शेखर अडकमोल यांनी सांगितले. शेखर अडकमोल हा पुणे येथील विनायक जाधव यांच्याकडे त्याने शिक्षण घेतलेले आहे. अवघ्या दोन वर्षापासून त्याने गाव व परिसरातील १०० च्या वरती विषारी साप पकडून त्यांना गावाबाहेर जंगलात सोडलेले आहे. कुठल्याही सापाची त्याने हत्या केलेली नाही. त्याचप्रमाणे अजय बाळू अडकमोल हा सुद्धा अवघ्या चार वर्षापासून साप पकडत आहे त्यामुळे गाव परिसरात त्यांना पाचारण केले जात असते.