जिल्ह्यात आढळले नवे ११८५ रुग्ण,

07 Sep 2020 22:13:10
जळगावात ३२८ रुग्णांची भर, ५१७ जण कोरोनामुक्त
 
dfnk_1  H x W:
 
जळगाव : जिल्ह्यात सोमवारी पुन्हा कोरोनाने नवा विक्रम केला असून एकाच दिवसात तब्बल ११८५ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यात सर्वाधिक जळगाव शहरातील ३२८ रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण रुग्णसंख्या ३३ हजार ६१८ एवढी झाली आहे. दिवसभरात ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ५१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
 
सोमवारी पुन्हा कोरोनोन एक हजारांचा आकडा पार केला असून जिल्ह्यात ११८५ नवीन रुग्णांची भर पडली आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर ३२८, जळगाव ग्रामीण ८२, भुसावळ ५५, अमळनेर ८२, चोपडा ६२, पाचोरा ६५, भडगाव ३८, धरणगाव २८, यावल १०६, एरंडोल २९, जामनेर २६, रावेर १७, पारोळा ७१, चाळीसगाव ९५, मुक्ताईनगर ७१, बोदवड १३, इतर जिल्ह्यातील १७ अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात ७ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात भडगाव, मुक्ताईनर तालुक्यात प्रत्येकी २ तर जळगाव शहर, जामनेर, एरंडोल तालुक्यात प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0